अनिकेत घमंडी - डोंबिवली
प्रदूषणात डोंबिवलीचा देशभरात अव्वल क्रमांक आहेच. त्याचा परिणाम महापालिकेच्या ग्रंथालयात येणा:या वाचकवर्गावरही होत आहे. विविध वाहनांमुळे येथे होणा:या ध्वनी-वायुप्रदूषणामुळे वाचक आणि कर्मचारी प्रचंड त्रस्त आहेत. वाचकांच्या तक्रारी तरी किती घ्यायच्या अन् त्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न येथील ग्रंथपालांना पडला आहे.
शहराच्या पूर्वेला महापालिकेच्या उपइमारतीलगतच बाजी प्रभू चौकात निवासी विभागाच्या बस थांब्याजवळ पालिकेचे ग्रंथालय आहे. या वास्तूत तब्बल 5क् हजारांहून अधिक पुस्तके आहेत. पालिकेच्याच अभ्यासिकेसह ग्रंथालयाच्या मूळ वास्तूच्या पुनर्बाधणीचे काम फडके क्रॉस रोडवरील टिळक पथ येथे गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र, येथील काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याने समस्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते.
या वाचनालयात वृत्तपत्रंसह अन्य मासिके वाचायला येणा:या वाचकांना, त्यातही ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, बाल गट तसेच महिला विभागात येणा:या वाचकांना या सा:याचा त्रस होतो. शांततेच्या वातावरणात वाचन करण्याची वाचकांची अपेक्षा असूनही येथे अपेक्षाभंग होत असल्याच्या अनेक तक्रारींनी ग्रंथपाल हैराण आहेत.
याच परिसरात सुलभ शौचालय असून, त्यामुळेही वाचक त्रस्त आहेत. सध्या पावसाचे पाणी प्रवेशद्वारासमोर साचल्यानेही ये-जा करणा:या नागरिकांची कुचंबणा होते. या पाण्याचा निचरा वेळेत होत नसल्याने त्याचीही दरुगधी पसरते आहे. वाचनालयात माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, या गैरसोयींमुळे अनेक जण येथे पाठ फिरवत असल्याचे दृश्य आहे.
येथील गैरसोयींसह प्रदूषणाबाबत सातत्याने तक्रारी येतात, ही वस्तुस्थिती आहे. मूळ जागेतील वाचनालयाची पुनर्बाधणी गतवर्षीच डिसेंबर्पयत होणार होती़ पण, तसे झाले नाही. त्यामुळे आणखी काही महिने वाचकांसह येथील कर्मचा:यांना ही समस्या भेडसावणार आहे. महापालिका प्रशासनानेच यावर योग्य तो तोडगा तातडीने काढावा.
- अनिल भालेराव, वरिष्ठ ग्रंथपाल, केडीएमसी
2क्11मध्ये या वास्तूच्या पुनर्बाधणीच्या प्रस्तावास मंजुरी मिळून काम सुरू झाले. 2क्12मध्ये ज्या ठेकेदाराला काम दिले होते, ते निकृष्ट दर्जाचे होते. त्यानंतर, स्टँडिंगच्या सभेत रि-टेंडरिंग करण्यासाठी तगादा लावला. मात्र, त्यास पाहणी दौ:याचे कारण पुढे करून सत्ताधा:यांनी स्थगिती दिली. नुकतीच त्यांनी परस्परच पाहणी केल्याचेही समजले. आता त्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
- राहुल चितळे, स्थानिक नगरसेवक, केडीएमसी
च्या वाचनालयासमोरून मानपाडा, गांधीनगरसह कल्याण, टाटा पॉवर लाइन, घरडा सर्कल, एमआयडीसी आदी भागांत जाणारी वाहतूक पहाटे 6 वाजल्यापासून मध्यरात्रीर्पयत सुरू असल्याने येथे सातत्याने ध्वनी व वायुप्रदूषण होते.
च्केडीएमटीच्या गाडय़ांना स्टार्टर देताना होणा:या कर्णकर्कश आवाजासह गर्दीतून वाट काढण्यासाठी हॉर्न मारणा:या अन्य वाहनांमुळे त्यात आणखीनच वाढ होते.
शहराच्या विविध भागांमधून येथे वाचक येत असतात. अनेकांकडे वाहने आहेत, मात्र या ठिकाणी पार्किगची सोय नसल्याने नागरिक इच्छा असूनही या ठिकाणी येणो टाळतात.