Join us

मध्य रेल्वेच्या 22 रेल्वे स्थानकांवर अपंग प्रवाशांसाठी शौचालयसुद्धा नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 2:37 PM

मुंबईतून भारतीय रेल विभागाला सर्वात जास्त महसूल मिळत असूनही मध्य रेल्वेचे २२ रेल्वे स्थाकांवर अपंग प्रवाशांसाठी शौचालयच नाही, अशी धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मध्य रेल्वेने दिली आहे.

मुंबई - मुंबईतून भारतीय रेल विभागाला सर्वात जास्त महसूल मिळत असूनही मध्य रेल्वेचे २२ रेल्वे स्थानकांवर अपंग प्रवाशांसाठी शौचालयच नाही, अशी धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मध्य रेल्वेने दिली आहे.आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मध्य रेल्वे कार्यालयकडे, मध्य रेल्वेची कोण-कोणते रेल्वे स्थाकांनवर महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालय आहे? याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मध्य रेल्वेचे जनमाहिती अधिकारी यांनी सांगितले की, मध्य रेल्वेचे तब्बल ७६ स्थानकांपैकी २२ रेल्वे स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालय नाही. तरी चिंचपोकळी, करी रोड, नाहूर, पलासधारी, केळावली, डोलावली, लोवजी, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूडस दरावे, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खान्डेश्वर, रबाळे या रेल्वे स्थाकांनवर दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालय नाही आहे. तसेच अटगांव रेल्वे स्थाकांनवर महिलांसाठी आतापर्यंत शौचालय नाही.शकील अहमद शेख यांनी पीयूष गोयल व जनरल मैनेजर मध्ये रेल्वे यांस पत्र पाठवून सादर रेल्वे स्थानकांवर महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालय निर्माण करण्याची मागणी केली आहे.