मुंबई : गेली तीन वर्षे शोधाशोध केल्यानंतर अखेर नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी मुंबईबाहेर जागा मिळाली़ मात्र हा गाळ वाहून नेण्यासाठी वाहनेच अपुरी असल्याने नाल्यांबाहेर गाळ पडून असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे मॉन्सूनपूर्व कामांच्या डेडलाइनला अवघे पाच दिवस उरले असताना ठेकेदारांकडून वाहने भाड्याने घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर शुक्रवारी मंजुरीसाठी येत आहे़छोट्या व मोठ्या नाल्यांमधून काढलेला गाळ तेव्हाच मुंबईबाहेरील डम्पिंग ग्राउंडवर टाकणे आवश्यक आहे़ मात्र अनेक वेळा ठेकेदार काढलेला गाळ नाल्यांच्या तोंडावरच ठेवून जातात़ वेळेत न उचलल्याने पावसाळ्यात तो गाळ पुन्हा वाहून नाल्यात जातो़ यंदा गाळ उचलण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे़ त्यासाठी विभागनिहाय ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत़ गाळ वाहून नेण्याचे कंत्राट दिलेल्या आधीच्या ठेकेदाराची मुदत याच महिन्यात संपत असल्याने पर्यायी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे़ मात्र वाहनेच नसल्याने अखेर ठेकेदारांकडून भाड्याने वाहने घेण्याची वेळ पालिकेवर आली आहे़ परंतु यातही ठेकेदारांनी जादा दराने कंत्राट भरले आहे़ यामध्ये मुंबईतील डम्पिंग ग्राउंड आणि मुंबईबाहेर अशा दोन वेगळ्या दरांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)गाळ वाहून नेण्याचे दर जास्तकुलाबा ते भायखळ्यापर्यंतच्या भागातील गाळ गोळा करून वाहून नेण्यासाठी मे़ तनिशा एंटरप्राइज यांना प्रतिटन ५४८ रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे़ या ठेकेदाराला एक कोटी ४३ लाख रुपये पालिका देणार आहे़ घाटकोपर, भांडुप, मुलुंड या ठिकाणी मे़ सीटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीला चार कोटी ३६ लाख रुपये तर बोरीवली, कांदिवली या भागासाठी मे़ आऱडी़ एंटरप्रायझेसला दोन कोटी ९१ लाख रुपये कंत्राट देण्यात येणार आहे़
नाल्यांमधील गाळ नेण्यासाठी वाहने नाहीत
By admin | Published: May 28, 2016 3:24 AM