Join us

विद्यापीठाकडून अजूनही ९ निकाल बाकीच, विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह कायम, निकालाचा गोंधळ संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 3:39 AM

सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही. अजूनही ४७७पैकी ९ निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत.

मुंबई : सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही. अजूनही ४७७पैकी ९ निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे हे निकाल जाहीर होणार तरी कधी, हे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांसमोर कायम आहे.‘निकालगोंधळ’ सुरूच असल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. एप्रिल महिन्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या निर्णयामुळे यंदाचे निकाल अजूनही रखडलेले आहेत. यंदा मुंबई विद्यापीठातून साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी हे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांच्या तब्बल १७ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करायची होती. त्यामुळे मे महिन्यात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत स्कॅनिंगच्या वेळी गोंधळ झाल्याने तपासणीची प्रक्रिया उशिरा सुरू झाली.त्यामुळे जून महिना उजाडूनही विद्यापीठाने निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली नाही. निकालाला लागलेला लेटमार्क आता विद्यार्थ्यांना चांगलाच महागात पडला आहे.आतापर्यंत जवळपास ४६८ निकाल विद्यापीठाने जाहीर केले असले तरीही त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. लावलेल्या निकालात अनेकांना नापास करण्यात आले आहे. तर, काहींना शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात याव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच एक गोष्ट समोर आली आहे की, निकालाला लागलेल्या लेटमार्कमुळे विद्यापीठाने मॉडरेशन करणे टाळले आहे. त्यामुळे येणाºया निकालामध्ये अजून गोंधळ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.निकालघाईमुळे चुकासूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाला अजूनही तब्बल ३५ ते ४० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. १५ सप्टेंबरपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याआधी निकाल लावण्याची घाई विद्यापीठाने केल्यास अजून किती विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला. निकालघाईमुळे उत्तरपत्रिका तपासणीत चुका होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याची खंतही संघटनांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ