काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, तो तर आघाडीचा आत्मा: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:10 PM2021-05-09T16:10:17+5:302021-05-09T16:11:31+5:30
Sanjay Raut: काँग्रेस पक्ष आघाडीचा आत्मा असून त्या पक्षाशिवाय देशात कोणतीही आघाडी तयार होऊ शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Sanjay Raut: काँग्रेस पक्ष आघाडीचा आत्मा असून त्या पक्षाशिवाय देशात कोणतीही आघाडी तयार होऊ शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
"तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी या देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही", असं ठाम मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.
शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच इतर राज्यात चिता पेटलेल्या दिसतायत: संजय राऊत
काँग्रेस पक्ष सत्तेत नसला तरी तो संपूर्ण देशात आहे. आसाममध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं. पण ते सत्तेवर येऊ शकले नाहीत. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आलं. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे. या देशाला उत्तम आघाडीची गरज आहे, असंही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील आघाडीप्रमाणे देशात आघाडी व्हावी
महाराष्ट्रात ज्यापद्धतीनं तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्याला उत्तम नेतृत्व दिलं. त्याच पद्धतीनं देशात उत्तम आघाडी निर्माण व्हायला हवी, असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. "देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे. तशी आघाडी देश पातळीवर असायला हवी. याबाबत शरद पवार यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी काही अशीच निर्माण झाली नाही. तीन पक्षांनी मिळून उद्धव ठाकरे यांना नेता केलं आणि सरकार उत्तम चाललंय. त्याच पार्श्वभूमीवर देशात सर्वांनी एकत्र येऊन अशी नवनवीन व्यवस्था तयार करायला हवी", असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.