पुढे धोका आहे; येथून प्रवास करताना काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 04:38 AM2020-08-17T04:38:26+5:302020-08-17T07:00:53+5:30

मात्र मुंबई पालिकेने सर्वेक्षणाअंती रेल्वे मार्गावरून जाणारे १३ पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले.

There is danger ahead; Be careful when traveling from here | पुढे धोका आहे; येथून प्रवास करताना काळजी घ्या!

पुढे धोका आहे; येथून प्रवास करताना काळजी घ्या!

googlenewsNext

मुंबई : मुंबई महापालिका दरवर्षी सर्वेक्षण करून धोकादायक पुलांची यादी जाहीर करते. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते किंवा विशेष खबरदारी घेतली जाते. यंदा कोरोनामुळे हे काम रखडले आहे. मात्र मुंबई पालिकेने सर्वेक्षणाअंती रेल्वे मार्गावरून जाणारे १३ पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले.
कोरोनामुळे या वर्षी उत्सव साजरे करण्यावर बंधने आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या पुलांवरून गणेशोत्सवात मिरवणूक काढू नका. गर्दी करू नका, असे आवाहन पालिकेने केले आहे. धोकादायक पुलांच्या कामाबाबत पालिकेने कार्यवाही सुरू केली असून, काही कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत. तोपर्यंत येथून जाताना काळजी घ्या. धोकादायक पुलांवर क्षमतेपेक्षा अधिक वजन लादू नका, पुलावर जास्त वेळ थांबू नका, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
>हे आहेत धोकादायक पूल
घाटकोपर, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा, मरिन लाइन्स, ग्रँट रोड फेरर, सँडहर्स्ट, फ्रेंच, केनडी, फॉकलंड, बेलासिस, महालक्ष्मी, प्रभादेवी-कॅरोल आणि लोकमान्य टिळक पूल.

Web Title: There is danger ahead; Be careful when traveling from here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.