पालघर : देशातील मत्स्य व्यवसायाची उलाढाल 36 हजार कोटींवर गेली असूनही या क्षेत्रचा विकास खुंटला आहे. यामुळे मत्स्यव्यवसायाचा ख:या अर्थान विकास करायचा असले तर केंद्रात स्वतंत्र मत्स्य विकास मंत्रलय निर्माण करालया हवे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले.
जिल्ह्यातील मच्छीमारांनी स्वयंस्फूर्तीने पावसाळ्यात बंदीपूर्वीच मासेमारी बंद केल्याचा चांगला परिणाम या वर्षी दिसल्याबद्दल त्यांनी मच्छीमारांची स्तुती केली. जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, फिशरमेन्स सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्था यांच्या वतीने शुक्रवारी सातपाटीमध्ये राज्यपाल राम नाईक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्रथम पालघरमधील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्याआधी राज्यपाल राम नाईक खाली उरतले असताना पोलिसांनी मानवंदना न दिल्याने राज्यपालांनी जिल्हाधिकारी बांगरांकडे नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधून नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात अजूनही अनेक सुधारणा होणो आवश्यक असल्याने येथील उच्चपदस्थ अधिका:यांच्या येत्या तीन दिवसांत बैठका घेऊन जिल्ह्यातील उणिवा दूर करण्यासाठी प्रय} करण्याच्या सूचना केल्या. मागच्या वर्षी 36 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मत्स्य निर्माण झालेला मत्स्य व्यवसाय शेती व्यवसायाच्या बरोबरीचा व्यवसाय असून खाद्यातून अधिकाधिक प्रोटीन देणारा हा व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले. लखनौ येथे झालेल्या देशभरातील मत्स्य व्यवसाय परिषदेमध्ये येथील अनेक प्रलंबित प्रश्नांची माहिती मी या वेळी दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री गावितांनी नाईक हे एक अजातशत्रू असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सध्या मच्छीमार व इतर समाजांत काम करीत असल्याचे सांगितले.आ. मनीषा चौधरी यांनी तिवरे वाचली तर मच्छीमार वाचेल, मच्छीमार वाचला तर आदिवासी कामगार वाचेल. तर तिवरांची कत्तले करु नका तिवरांचे रक्षण करा, असे त्यांनी सांगितले.
पालघरमधील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्याआधी राज्यपाल राम नाईक खाली उरतले असताना पोलिसांनी मानवंदना न दिल्याने राज्यपालांनी जिल्हाधिकारी बांगरांकडे नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही फोनवरुन नाराजी दर्शविली.