Join us

विमातळाच्या सुरक्षेचे चोरांनी काढले वाभाडे; तिसरी चोरी उघडकीस, अनोळखी विरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 11:26 AM

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमधून पैसे काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमधून पैसे काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याप्रकरणी अवघ्या पंधवड्यात तिसरा गुन्ह्याची सहार पोलिसांनी नोंद केला आहे. ज्यात दक्षिण मुंबईत बुरखे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मिनाझ सय्यद (५४) या महिला व्यावसायिकाच्या बॅगमधून भारतीय चलनासह दिरम आणि डॉलर लंपास करण्यात आले आहेत.

सय्यद या मोहम्मद अली रोडवर असलेल्या नूर मस्जिद येथे राहत असून, त्या ११ मार्च रोजी दुबई येथे जाण्यासाठी स्पाइस जेट एअरलाइन्सने निघाल्या. बोर्डिंगची वेळ १०.२० ची असल्याने त्यांनी ८.४५ च्या सुमारास सामनाचे चेक इन केले. सर्व प्रक्रिया पार पडल्यावर त्या ११ वाजून १५ मिनिटांनी निघालेले विमान ४ वाजून १५ मिनिटांनी दुबई विमानतळावर पोहोचले. सय्यद या साडेपाच वाजता त्यांच्या डेरा येथील नातेवाइकांकडे पोहोचल्या आणि त्यांनी बॅग उघडून पाहिली. तेव्हा त्यातील २० हजाराचे भारतीय चलन, ९ हजार यूएई दिरम तसेच ६ हजार अमेरिकन डॉलर त्यात नव्हते.

 इव्हेंट मॅनेजरचे २.५० लाख चोरले ! 

इव्हेंट मॅनेजर आयुशी अग्रवाल (२६) या मध्य प्रदेशच्या तरुणीनेदेखील २० मार्च रोजी सहार पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यात तिच्या बॅगमधून भारतीय चलनातील ५० हजार रुपये व ७ हजार दीरम मिळून २ लाख १४ हजार ५०० रूपये चोरण्यात आले. ती १३ मार्चला मैत्रिणीसह दुबईला निघालेली आणि सामान तिने लगेजमध्ये चेक इनसाठी पाठवले होते.

२२ मार्चची घटना

व्यावसायिक अमरदीप कपूर सिंग (५७) हे २२ मार्च, २०२३ रोजी मुलगा अधिश सोबत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून  दुबईला पोहोचले. बॅग उघडली तेव्हा ४० दिरम गायब होते. त्यानंतर त्यांनी मुंबई विमानतळावरील बॅगचे स्क्रीनर, लोडर आणि फिडर यांच्यावर संशय घेत सहार पोलिसात गुन्हा नोंदवला.

१९ मार्चलाही चोरी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे पैसे चोरी झाल्याचा संशय त्यांना आला. त्या १९ मार्च रोजी मुंबईत परतल्या आणि शुक्रवारी याप्रकरणी त्यांनी सहार पोलिसांत जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा प्रकारच्या चोरीचे तिसरे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे चोरांना लवकरात लवकर अटक करावे, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. 

 

टॅग्स :विमानतळमुंबईचोरी