सहा वर्षांत ३०० जणांचे ‘अग्निबळी’, अग्निसुरक्षेकडील दुर्लक्षामुळे घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:19 AM2018-06-12T05:19:47+5:302018-06-12T05:19:47+5:30

गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या असून, यात ३०० जणांचा बळी गेला आहे.

There have been 300 Death in fire In six years | सहा वर्षांत ३०० जणांचे ‘अग्निबळी’, अग्निसुरक्षेकडील दुर्लक्षामुळे घटनांत वाढ

सहा वर्षांत ३०० जणांचे ‘अग्निबळी’, अग्निसुरक्षेकडील दुर्लक्षामुळे घटनांत वाढ

Next

मुंबई  - अग्निसुरक्षाविषयक घटकांकडे करण्यात येत असलेल्या दुर्लक्षामुळे मागील काही वर्षांत मुंबई शहर आणि उपनगरातील आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. या आगीच्या घटनांचा विचार केला असता गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या असून, यात ३०० जणांचा बळी गेला आहे.
माहिती अधिकर कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रांतून ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे २०१२ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आगीच्या घटना घडल्या आहेत? तसेच आग दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याबाबत माहिती विचारली होती. यावर मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी ए.व्ही. परब यांनी शेख यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती दिली. माहितीप्रमाणे सन २०१२ पासून एप्रिल २०१८ पर्यंत एकूण २९ हजार १४० आगी लागण्याच्या घटना घडल्या. यात एकूण ३०० जणांचा मृत्यू झाला, तर एकूण ९२५ जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले. शिवाय १२० अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी आगीच्या दुर्घटनांत जखमी झाले.

२०१२-२०१३ मध्ये एकूण ४ हजार ७५६ आगीच्या घटना घडल्या. यात ६२ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ४४ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण १७७ लोक जखमी झाले असून त्यात १३९ पुरुष आणि ३८ स्त्रियांचा समावेश आहे. १३ अग्निशमन दलाचे अधिकारी/ कर्मचारी जखमी झाले.

२०१३-२०१४ मध्ये एकूण ४ हजार ४०० आगीच्या घटना घडल्या. एकूण ५८ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ३९ पुरुष आणि १९ स्त्रियांचा समावेश आहे. १४१ लोक जखमी झाले असून त्यात ८७ पुरुष आणि ५४ स्त्रियांचा समावेश आहे. २९ अग्निशमन दलाचे अधिकारी/ कर्मचारी जखमी झाले.

२०१४-२०१५ मध्ये एकूण ४ हजार ८४२ आगीच्या घटना घडल्या. एकूण ३२ लोकांचा मृत्यू झाला. त्यात २० पुरुष आणि १२ स्त्रियांचा समावेश आहे. १२५ लोक जखमी झाले. त्यात ९२ पुरुष आणि ३३ स्त्रियांचा समावेश आहे. एका अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ३१ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१५-२०१६ मध्ये एकूण ५ हजार २१२ आगीच्या घटना घडल्या. एकूण ४७ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ३४ पुरुष आणि १३ स्त्रियांचा समावेश आहे. १२८ लोक जखमी झाले. त्यात ९१ पुरुष आणि ३७ स्त्रियांचा समावेश आहे. ५ अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यू झाला. एकूण २३ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१६-२०१७ मध्ये एकूण ५ हजार २१ आगीच्या घटना घडल्या. एकूण ३४ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १८ पुरुष आणि १६ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण ११५ लोक जखमी झाले. त्यात ८३ पुरुष आणि ३२ स्त्रियांचा समावेश आहे. एका अग्निशमन कर्मचाºयाचा मृत्यू झाला. एकूण १३ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१७-२०१८ मध्ये एकूण ४ हजार ९२७ आगीच्या घटना घडल्या. एकूण ५५ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ३७ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण २१९ लोक जखमी झाले. त्यात १३२ पुरुष आणि ८७ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण ८ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१८ पासून एप्रिलपर्यंत एकूण ७१० आगीच्या घटना घडल्या. एकूण ५ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. एकूण २० लोक जखमी झाले. त्यात १२ पुरुष आणि ८ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण ३ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दल यांची आहे.

Web Title: There have been 300 Death in fire In six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.