Join us

जलवाहिनीला लागली गळती, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 9:35 PM

सायन कोळीवाडा, वडाळ्यात पाणीबाणी

मुंबई:महानगरपालिकेच्या सायन कोळीवाडा , वडाळा , कोकरी आगार, म्हाडा कॉलनी असा परिसर व्यापणाऱ्या एफ उत्तर विभागातील अॅंटॉप हिल परिसरात सेक्टर ६ जवळ ६०० मि. मी. जलवाहिनीला गळती लागली आहे.  त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले असून या कामामुळे ‘एफ उत्तर’ विभागातील काही परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती काम पूर्णत्वास आल्यानंतर जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

‘एफ उत्तर’ विभागातील अॅंटॉप हिल परिसरात ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीला १ जानेवारी रोजी गळती उद्भवली होती. याबाबत माहिती मिळताच सदर जलवाहिनींच्या दुरुस्तीचे काम  हाती घेण्यात आले. या ठिकाणी ३०० मि. मी. जलवाहिनीची दुरूस्ती केल्यानंतर दुसऱ्या ६०० मि. मी. जलवाहिनीमधूनही गळती होत असल्याचे ही दिसून आले . दरम्यान २ जलवाहिन्यांपैकी ३०० मि. मी. व्यासाच्या दुरूस्तीचे काम मंगळवारी सकाळी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सी. जी. एस कॉलनी, महात्मा गांधी नगर, भारतीय कमला नगर या परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.या भागात पाणीपुरवठा सुरळीत नाहीएका जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी ६०० मि. मी. जलवाहीनी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही तासांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘एफ उत्तर’ विभागातील कोकरी आगर, विजय नगर, संगम नगर, दोस्ती एकर्स, हिम्मत नगर, शांती नगर, आझाद मोहल्ला, अंटोप हिल, वडाळा पूर्व, गणेश नगर, शिवशंकर नगर, नेहरू नगर , इंदिरा नगर, वडाळा ट्रान्झिट कॅम्प, पंजाबी कॉलनी, सेवा समिती, म्हाडा कॉलनी, सायन कोळीवाडा, बी. पी. टी., बंगालीपुरा, राजीव गांधी नगर ई. ठिकाणी मंगळवारी पाणीपुरवठा झाला नाही.दुरुस्तीच्या कामात आव्हानेजलवाहिनीला गळती झालेल्या ठिकाणी दुरूस्तीच्या कामासाठी ३५ कामगार - कर्मचारी - अधिकारी कार्यरत आहेत. झजलवाहिनीला गळती झाल्याच्या ठिकाणची मात्र जागा ही अतिशय चिंचोळी आणि खोल असल्याने दुरूस्तीसाठी अनेक आव्हाने या दुरूस्ती कामात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी या कामाची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे

टॅग्स :मुंबई