'राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, या घटना..."; फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवर भाजपा नेत्याचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:17 AM2024-06-28T09:17:58+5:302024-06-28T09:20:57+5:30
Uddhav Thackeray Devendra Fadnavis : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे, काल पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला.
Uddhav Thackeray Devendra Fadnavis ( Marathi News ) : कालपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये भेट झाली. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार का? या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे काल भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीचेही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
काही महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी या दोन नेत्यांच्या झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. या भेटीवर भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी सूचक वक्तव्य केले. टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पाटील यांनी हे विधान केले आहे.
भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर
"राजकारणात या घटना घडत असतात. कदाचीत दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये भेटले असतील. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. सभागृहात सर्वांची भेट होत असते. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू असू शकत नाही, असं सूचक विधान भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात आता उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, सर्वांची भेट होत असते. बाहेर लग्नात, कार्यक्रमात भेटी होतात. काल लोकसभेत राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांना चेअरवर बसवलं. हे लोकशाहीमधील संकेत असतात, त्यादृष्टीने पाहिलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले. "महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवायचे संकेत दिसत आहेत. त्याबाबत अजुनही चर्चा झालेल्या नाहीत. इंदापुरच्या जागेबाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांनी मान्य करायचं असं ठरलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचं मत आहे, काल झालेले वक्तव्य हे पक्षाच मत नाही, त्या कार्यकर्त्याच वैयक्तीक मत आहे, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नये
उद्धव ठाकरे हे दुसऱ्या मजल्यावरील विधानपरिषद सभागृहात जाण्यासाठी लिफ्टजवळ उभे होते. फडणवीसही तिथे आले. दोघांमध्ये अडीच-तीन मिनिटे चर्चा झाली.
- तेवढ्यात लिफ्ट आली आणि दोघे एकत्रितच दुसऱ्या मजल्यावर गेले. लिफ्टमध्येही ते एकमेकांशी बोलले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ही भेट म्हणजे योगायोग होता, त्याकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नये.