... अन्यथा ४८ जागांवर निवडणूक लढवणार ‘वंचित’; आंबेडकरांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 06:19 AM2023-09-26T06:19:32+5:302023-09-26T06:19:55+5:30
काँग्रेस आणि संयुक्त सहयोगी पक्षांची तिसरी बैठक मुंबईत झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड्. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रावर काँग्रेसकडून अद्याप उत्तर आलेले नाही. उत्तरासाठी आणखी ७ दिवस वाट पाहणार आहेत. अन्यथा सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा ॲड्. प्रकाश आंबेडकर दिला आहे.
काँग्रेस आणि संयुक्त सहयोगी पक्षांची तिसरी बैठक मुंबईत झाली. तेव्हा १ सप्टेंबरला वंचितचे प्रवक्ते ॲड्. प्रियदर्शी तेलंग यांनी खरगे यांना एक ई-मेल लिहिला होता. मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचितला आमंत्रण पाठवले असल्याच्या त्यावेळच्या अफवा खोडून काढण्यासाठी आणि दुसरे वंचितचे दरवाजे खुले आहेत हे सांगण्यासाठी हे पत्र होते. ई- मेल पाठवून आणि ते पत्र तेलंग यांच्या ट्विटर हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे. परंतु खरगे वा काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. पुढील ७ दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा, आम्ही सर्व ४८ जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करत आहोत असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.