विमानतळाकडे जाताना नाही ट्रॅफिक, सुसाट जा टेचीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 09:43 AM2023-05-27T09:43:12+5:302023-05-27T09:43:22+5:30

मुंबई विमानतळाच्या टी १ आणि टी २ पर्यंतचा प्रवास व्यत्ययरहित करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे

There is no traffic on the way to the airport, just go to Tech |  विमानतळाकडे जाताना नाही ट्रॅफिक, सुसाट जा टेचीत

 विमानतळाकडे जाताना नाही ट्रॅफिक, सुसाट जा टेचीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंधेरी - घाटकोपर लिंक रोडवरील जागृती नगर मेट्रो स्थानकाखालील पूल आता खुला करण्यात आला आहे. 
हा पूल दक्षिण वाहतूक मार्गिकेला थेट जोडला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई विमानतळाच्या टी १ आणि टी २ पर्यंतचा प्रवास व्यत्ययरहित करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वासही एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता विमानतळाकडे सुसाट जाता येईल.

 प्रकल्पाचे नाव : जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या खाली नरसी मेहता रोडवरील एजीएलआरवर व्हायडक्टचे डिझाइन आणि बांधकाम
 कंत्राटदार : आरई इन्फ्रा

सुपर स्ट्रक्चर : आरसीसी स्लॅबसह स्ट्रक्चरल स्टीलमध्ये

प्रकल्प पूर्ण होण्यात आलेले अडथळे
 वाहतूक परवानगीला विलंब
 रहिवाशांमुळे रात्रीचे काम अशक्य, कोविड महामारी
 गटार, जलवाहिन्या, वीज तारा स्थलांतरित कराव्या लागल्या.

अंधेरी-घाटकोपर लिंक रोड हा वेस्टर्न एक्स्प्रेस ते इस्टर्न एक्स्प्रेस वे यांना जोडणारा मुख्य दुवा आहे.
हा रोड मुंबई आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळाशी जोडला जातो.
मेट्रो लाइन १ कॉरिडॉरचे पिअर एजीएलआरच्या मध्यभागी आहेत.

Web Title: There is no traffic on the way to the airport, just go to Tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.