Join us

विनोदापेक्षा फालतुगिरीच जास्त

By admin | Published: June 20, 2014 11:01 PM

साजिद खानला कधी कळणार हा प्रश्नच आहे. कारण कॉमेडीच्या नावाखाली बनवलेल्या ‘हमशकल्स’ या चित्रपटाचा स्तर अत्यंत वाईट आहे.

 विनोदी चित्रपट बनवणो सोपे नसते, हे साजिद खानला कधी कळणार हा प्रश्नच आहे. कारण कॉमेडीच्या नावाखाली बनवलेल्या ‘हमशकल्स’ या चित्रपटाचा स्तर अत्यंत वाईट आहे. विनोदी चित्रपट बनवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही साजिद काही त्यात यशस्वी होताना दिसत नाही. पण दुसरीकडे टुकार चित्रपट बनवल्याचा शिक्का मात्र त्याला मिळतो. हा चित्रपटही त्याच पठडीत मोडतो.

कथा लंडनमध्ये घडते. अशोक (सैफ अली खान) हा लंडनमधला मोठा उद्योगपती आहे. त्याला कॉमेडीयन व्हायचे असते. त्यासाठी त्याचा मित्र कुमार (रितेश देशमुख) त्याला मदत करतो. पण तो त्याच्या प्रत्येक ब:या-वाईट गोष्टीत नेहमीच त्याच्या सोबत असतो. अशोकच्या वडिलांच्या आजारपणामुळे व्यवसायाची जबाबदारी अशोकच्या मामावर (राम कपूर) येऊन पडते. मात्र, मामाचा या पूर्ण व्यवसायावरच डोळा असतो. त्यासाठी अशोकचा काटा काढणो गरजेचे असते. म्हणून मामा डॉक्टर मित्रच्या मदतीने अशोक आणि कुमारवर असे प्रयोग करतो की ते कुत्र्यासारखे वागतात. त्यामुळे त्यांची रवानगी वेडय़ांच्या रुग्णालयात होते. 
तेथेच त्यांना त्यांचे ‘हमशकल्स’ दिसतात. आपले डोके खराब असल्याचे या हमशकल्सचे मत असते. गोंधळात गोंधळ म्हणजे येथे अशोकच्या मामाचाही हमशक्ल आहे. या रुग्णालयातच काहीतरी घोळ होतो आणि डोके खराब असलेली अशोक - कुमारची जोडी उद्योगपती अशोकच्या घरी जाते. त्याचे ते आलिशान घर म्हणजे रियालिटी शोचा सेटच आहे असे त्यांना वाटते. एकंदर या अदलाबदलीमुळे मात्र वेडय़ांचे हॉस्पिटल आणि अशोकच्या घरात भरपूर गोंधळ उडतो. शेवटी जेव्हा हा सगळा गोंधळ कळतो तेव्हा अशोक, कुमार, मामा हे तिघे आणि त्यांचे हमशक्ल समोरासमोर येतात. अशाच काही टुकार दृश्यांनी हा चित्रपट संपतो. 
उणिवा - डबल रोल असलेले चित्रपट बनवणो सोपे नसते. खूप गोंधळ झाला तर चित्रपट फसू शकतो. इथे मात्र साजिदने एकदम ट्रिपल रोल देऊन विनोदी चित्रपट बनवण्याचा घाट घातला. जो सपशेल फसला. लोकांना हसवण्यासाठी जी दृश्ये आहेत, त्यात काहीच दम नाही. हे यामागचे खरे कारण आहे. कॉमेडीला काहीच लॉजिक नसते हे खरे. मात्र, तरीही त्याचे अजीर्ण होऊ नये, एवढी त्याची काळजी घ्यायलाच हवी. 
एका औषधाने माणूस एक दिवस कुत्र बनतो, या विनोदाचे काय लॉजिक आहे ते कळतच नाही. या विषयावर विनोदी चित्रपट बनवणो हे दिग्दर्शक आणि लेखकाच्या मूर्खपणाचे लक्षणच म्हणायला हवे. सुरुवातीच्या दहा मिनिटांतच चित्रपट पूर्णपणो भरकटतो. 
सैफ, रितेश, राम कपूर यांना दिलेल्या मुलीच्या गेटअपने मनोरंजन तर सोडाच पण हसूही येत नाही. शेवटही अत्यंत वाईट आहे. ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाच्या शेवटचा भाग याच्या शेवटी पुन्हा वापरला आहे. सैफ अली खान विनोदी भूमिकेत अत्यंत कमकुवत वाटतो. तर विनोदाचा दादा मानल्या जाणा:या रितेशनेही पूर्णपणो निराशा केली आहे. राम कपूरचा तर विनोद हा प्रांतच नसल्याचे जाणवते. तमन्ना भाटिया, बिपाशा बासू, ईशा गुप्ता फक्त ग्लॅमरची गरज पूर्ण करतात. थोडक्यात, दिग्दर्शक म्हणून साजिद खान पुन्हा अपयशी ठरला आहे. 
वैशिष्टय़े - गाणी चांगली जमून आली आहेत. हिमेश रेशमियाचे संगीत आणि गाण्यांचे चित्रीकरण चांगले आहे. 
 
का पाहू नये
सुरुवातीच्या एका दृश्यात वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या अशोक आणि कुमारला शिक्षा देण्यासाठी साजिदच्याच ‘हिम्मतवाला’ चित्रपटाची डीव्हीडी दाखवली जाते. तर नंतर साजिदची बहीण फरहा खानच्या ‘तीस मार खां’ चित्रपटाची डीव्हीडी दाखवतात. यातच चित्रपटाचे अपयश आहे.
 
का पाहावा
विनोदाच्या नावाखाली काहीही फालतू बघणो पसंत असलेल्यांनी हा चित्रपट पाहावा. 
 
हिंदी चित्रपट
अनुज अलंकार