Join us

नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:34 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या संकुलातील नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन होणे गरजेचे असल्याचे मत एमएमआरडीएचे समाज विकास अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या संकुलातील नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन होणे गरजेचे असल्याचे मत एमएमआरडीएचे समाज विकास अधिकारी पी. जी. स्वामी यांनी व्यक्त केले. दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा, म्हाडा कॉलनी, जगन्नाथ कॉम्प्लेक्स येथे शिवसेना उपनेते व म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गृहनिर्माण संस्थांची फेडरेशन नोंदणीविषयक मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना स्वामी यांनी याठिकाणी १२ गृहनिर्माण संस्था असून, फेडरेशन स्थापन करण्यासाठी कमीत कमी पाच संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

मुंबईसारख्या शहरात आपण राहत असलेली जमीन आपल्या नावाने असणे भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. गावाकडे प्रत्येकाची जमीन आपल्या नावे असते. मात्र, मुंबईत असे अपवादात्मक सापडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेचा विकास होण्यासाठी फेडरेशन असणे किती अत्यावश्यक आहे याबाबत त्यांनी उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

----------------------------