मुंबई : विद्यार्थीसंख्येअभावी पालिकेच्या मराठी शाळा बंद पडत असताना मुंबईत २१६ अनधिकृत शाळा राजरोस सुरू आहेत. या शाळांवर कारवाईचे राज्य सरकारचे आदेश असताना पालिका प्रशासन मात्र सुस्त आहे. परिणामी या बेकायदा शाळांत शिकणाऱ्या ४० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे.मुंबईत सुमारे २१६ प्राथमिक शाळा या अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीत सदस्यांनी उघड केली. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा फलक शाळेबाहेर लावण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला दिले आहेत. मात्र या शाळांवर कारवाई सोडा फलकही लावलेले नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली. राज्य सरकारने अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी कारवाईमुळे ४० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येईल, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. काही छोट्या छोट्या बाबींची या शाळांनी पूर्तता केलेली नाही. मात्र २०१९ जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी या शाळांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरही नियमांची पूर्तता न करणाºया अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात येईल़
मुंबईत २१६ अनधिकृत शाळांवर कारवाई नाहीच, ४० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:23 AM