Join us

पुस्तकापेक्षा श्रेष्ठ मित्र कोणी नाही- आचार्य लोकेशजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 2:17 AM

जैन धर्माच्या पर्युषण महापर्वामध्ये लोकेशजी यांचे आॅनलाइन व्याख्यान होत असून, याद्वारे भगवान महावीरांच्या संदेशाचा भाविकांना लाभ घेता येत आहे.

मुंबई: संत साहित्य आणि संत साहित्याचे वाचन जीवनात उत्तम मूल्ये निर्माण करतात. पुस्तकापेक्षा श्रेष्ठ मित्र कोणी नाही, असे अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेशजी म्हणाले. जैन धर्माच्या पर्युषण महापर्वामध्ये लोकेशजी यांचे आॅनलाइन व्याख्यान होत असून, याद्वारे भगवान महावीरांच्या संदेशाचा भाविकांना लाभ घेता येत आहे.‘ज्ञान मार्ग स्वाध्याय योग’ या विषयावर भाविकांना संबोधित करताना आचार्य लोकेशजी म्हणाले, स्वाध्यायचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वत:ला जाणून घेणे. दुसरे म्हणेज ज्ञान-विज्ञानाची माहिती घेणे म्हणजे आत्म-अभ्यास आहे. भगवान महावीर यांच्या प्रवचनानुसार, आत्मजागृतीमुळे विवेक जागृत होतो.त्यावरून एखाद्याला चांगले व वाईट कळू शकते. स्व-शिक्षण, पाठ, ग्रंथ, पुनर्निर्देशन आणि शास्त्र असे स्वाध्यायचे प्रकार आहेत. राष्ट्र कवी रामधारीसिंग दिनकर यांच्या ओळींचा आधार देताना ते म्हणाले, जेथे अंधकार आहे तिथे प्रतिष्ठा नाही आणि जिथे साहित्य नाही तो मृत देश आहे. चांगली पुस्तके आपल्या जीवनात प्रकाशाचा आधारस्तंभ बनतात. जीवनाची दिशा स्पष्ट करतात. तंत्रज्ञानाच्या, विकासाच्या या युगात आत्मशिक्षण कमी होत आहे. रोजच्या नित्यकर्मात चांगले साहित्य वाचणे आणि जीवनात त्या समाविष्ट करणे गरजेचे आहे.