- अतुल कुलकर्णीमुंबई : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनेसोबत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने समर्थन देत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारला आज १०० दिवस पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने तीनही पक्षाच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी जवळपास समान प्रश्नांवर मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी दिलेली उत्तरे मोठी रंजक आहेत. तिघांमध्येही एकवाक्यता आहे हे यातून समोर आले.आपल्या पक्षातल्या बडबोल्या नेत्यांविषयीची नाराजी या नेत्यांनी आडपडदा न ठेवता बोलून दाखवली. त्याचवेळी आमच्या चर्चा चांगली होते, सगळे निर्णय चर्चेने होतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन असले तरीही त्यांच्यात कणखरपणा आहे. काम करताना सगळ्यांना सोबत घेण्याची त्यांची तयारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे मुद्दे मांडण्याची त्यांची स्वत:ची अशी पध्दती आहे. ती सांमजस्याची आहे. किमान समान कार्यक्रम आधीच तयार केला आहे व त्यावरच सरकार चालू आहे. त्यामुळे आमच्यातले वाद माध्यमांनी व भाजप नेत्यांनीच जास्त वाढवले आहेत असेही सांगायला हे नेते विसरलेले नाहीत.
महाआघाडीत कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही!
By अतुल कुलकर्णी | Published: March 06, 2020 4:03 AM