Join us

विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळ सुरूच

By admin | Published: April 22, 2015 3:44 AM

मुंबई विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेतील गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परीक्षा तोंडावर आली तरी एमएच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप हॉल

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेतील गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परीक्षा तोंडावर आली तरी एमएच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप हॉल तिकीट मिळालेली नाहीत. ज्यांना हॉल तिकीट देण्यात आली आहेत त्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.विद्यापीठाच्या एमएच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील आठवड्यापासून सुरू होत आहेत. २८ एप्रिलपासून समाजशास्त्र विषयाची परीक्षा सुरू होत आहे. आयडॉलमधून या परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा उल्लेखच नाही.परीक्षेपूर्वी दोन दिवस अगोदर विद्यापीठाच्या वेबसाइटवर परीक्षा केंद्राची माहिती देण्यात येईल, असे विद्यापीठाने हॉल तिकिटांवर नमूद केले आहे. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जुने वेळापत्रक देण्यात आले आहे. याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.