तिसऱ्या यादीतील कट ऑफ गुणांत घसरण नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:15+5:302020-12-16T04:25:15+5:30
अकरावी प्रवेश : नामांकित महाविद्यालयांत प्रवेश फुल्ल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी प्रवेशाच्या नियमित अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांकडून ...
अकरावी प्रवेश : नामांकित महाविद्यालयांत प्रवेश फुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या नियमित अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली असून अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवेश बंद करण्यात आले असून ज्या महाविद्यलयात जागा उपलब्ध आहेत तेथील कट ऑफ गुणांमध्येही वाढ झाल्याने ७० ते ८५ टक्क्यांमधील विद्यार्थ्यांची निराशा झाली.
पहिल्या गुणवत्ता यादीत एचआर महाविद्यालयाचे कट ऑफ गुण ९३.८% असताना तिसऱ्या गुणवत्ता यादीत त्यात वाढ होऊन ते ९४.२% इतके झाले. केसी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफमध्येही दुसऱ्या गुणवत्ता यादीपेक्षा १.२% वाढ झालेली दिसून आली.
वाणिज्य शाखेच्या कट ऑफमध्ये घसरण झाल्याचे दिसून आलेले नाही. रुईया महाविद्यालयाच्या कला व विज्ञान शाखेच्या कटऑफमध्येही घसरण न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या त्या महाविद्यलयातील प्रवेशाची संधी हुकल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. पोदार महाविद्यालयातील जागा फुल्ल झाल्याने पुढील फेरीसाठी जागाच उपलब्ध नाहीत.
* कटऑफ चढाच
यंदा नामांकित महाविद्यालयांतील गुणांचा कटऑफ खाली घसरलाच नसल्याने त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने निराशाच पडली. दहावीचा निकाल यंदा चांगला लागला असल्याने आधीच अकरावी प्रवेशासाठी खुल्या गटात मोठी स्पर्धा होती. त्यातच मराठा संवर्गाच्या जागा त्यात समाविष्ट केल्याने स्पर्धा आणखी वाढली आणि नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये विशेष घसरण झाली नाही.
.............................
तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर महाविद्यालयाचे कट ऑफ गुण( गुण टक्क्यांमध्ये)
महाविद्यालय - कला- वाणिज्य- विज्ञान
एचआर- ...- ९४.२-...
केसी- ९०.२ -९२.२- ८९.२
जयहिंद- ९२.४-९२.६- ८८.८
रुईया-९४.०-...-९४.२
पोदार- ...-...-...
रुपारेल- ९०.२- ९२.०-९१.४
साठे- ८४.६- ९०.२- ९०.०
डहाणूकर-...-७६.१६-...
..............................