मुंबईत डॉक्टरांच्या संपाचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:26 AM2018-07-29T01:26:47+5:302018-07-29T01:27:02+5:30

केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील खासगी डॉक्टर शनिवारी एक दिवसाच्या संपावर गेले होते. पहाटे ६ वाजल्यापासून सुरू केलेला हा संप संध्याकाळी ६ वाजता मागे घेण्यात आला.

There is no effect of a doctor's strike in Mumbai | मुंबईत डॉक्टरांच्या संपाचा परिणाम नाही

मुंबईत डॉक्टरांच्या संपाचा परिणाम नाही

googlenewsNext

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील खासगी डॉक्टर शनिवारी एक दिवसाच्या संपावर गेले होते. पहाटे ६ वाजल्यापासून सुरू केलेला हा संप संध्याकाळी ६ वाजता मागे घेण्यात आला. दरम्यान, अत्यावश्यक रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आल्याने मुंबईत तरी या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, संप यशवीरीत्या पार पडल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून जाहीर करण्यात आले आहे.
या संपात देशभरातील ३ लाखांहून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. संप यशस्वीरीत्या पार पडला हा आमचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया इंडियन मेडिकल कौन्सिलचे सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी दिली आहे. मेडिकल क्षेत्रातील विविध संघटनांनी या संपात आपला सहभाग दर्शविला असून आम्हाला पाठिंबा दिला आहे. विविध भागांतील खासदार, आमदार यांना आम्ही या संपातून निवेदने दिली आहेत. आमच्या संपाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून तो शांततेत पार पडला हे आमच्या संपाचे यश असल्याचे त्यांनी म्हटले. सोमवारी लोकसभेत अजेंड्यावर हे बिल असणार असून, त्यावर काय निर्णय होतो यावर पुढची वाटचाल आणि रणनीती अवलंबून असेल, असे संघवी यांनी म्हटले आहे.

Web Title: There is no effect of a doctor's strike in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.