Join us

विकास कामांना अपेक्षित गती नाही

By admin | Published: January 11, 2015 11:32 PM

महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५ मध्ये गेल्या काही वर्षात लोकसंख्यावाढ झाली. अनेक नागरी संकुले उभे राहिली. त्यामध्ये अनधिकृत इमारतीचाही चांगलाच भरणा आहे

वसई : महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५ मध्ये गेल्या काही वर्षात लोकसंख्यावाढ झाली. अनेक नागरी संकुले उभे राहिली. त्यामध्ये अनधिकृत इमारतीचाही चांगलाच भरणा आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागते. शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या याच भागातून जातात. परंतु या प्रभागातील नागरिकांना मात्र पुरेसे पाणी मिळत नाही. या प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक हे ्रप्रभाग समितीचे सभापती म्हणून कार्यरत होत. परंतु योग्य त्या नागरी सुविधा आपल्या करदात्यांना उपलब्ध करण्यात त्यांना यश आले नाही. सध्या सभापती म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल साने हे पाणी या विषयातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वसई-विरार उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यात त्यांचे प्रयत्न कारणी लागले.प्रभाग क्र. ५ हा चाळी अनधिकृत बांधकामे व काही प्रमाणात लघुउद्योग अशांनी वेढलेला आहे. प्रभागामध्ये कष्टकरी चाकरमानी मतदारांचा सर्वाधिक भरणा आहे. विकासकामासाठी पुरेसा आर्थिक निधी मिळूनही विकासाला गती येऊ शकली नाही. या प्रभागात गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. या प्रभागात विरोधकांकडून आव्हान मिळण्याची शक्यता कमी असली तरी स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्यामुळे मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. यंदा या प्रभागामध्ये सत्ताधारी पक्षाकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्य प्रभागामध्ये रस्ते गटारे व अन्य नागरी सुविधांची कामे होत असतांना. हा प्रभाग उपेक्षित का? असा प्रश्न मतदारांना भेडसावतो. या परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरीकांंचे प्रचंड हाल होत असतात. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना रिक्षाचालकांच्या मनमानीपणाला सामोरे जावे लागते. तर नजीकचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या दंडेलीपुढे नागरिक हैराण झाले आहेत.त्यावर तोडगा कोण काढणार?