मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोणतीही तपासणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:18 AM2020-03-11T01:18:21+5:302020-03-11T01:18:52+5:30

रेल्वेतून साथीचा फैलाव होण्याची भिती, फक्त उद्घोषणा सुरू

There is no inspection of passengers in Mumbai Express | मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोणतीही तपासणी नाही

मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोणतीही तपासणी नाही

Next

मुंबई : मुंबई दाखल होणाºया एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नाही. परिणामी, एक्स्प्रेसद्वारे कोरोनाचा शिरकाव मुंबईतही होण्याची भीती आहे. रेल्वेकडूनकोरोनाविषयी जनजागृती केली जात असली, तरी तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली येथे लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबतात, परंतु येथे कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, हा उद्देश आहे. मात्र, आता देशभरात कोरोनाचे संशयित रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी पुण्यात पाच आणि केरळमध्ये तीन संशयित रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे देशांतर्गत एक्स्प्रेसद्वारे प्रवास करणाºया प्रवाशांची तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून केली आहे.

स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे कठीण आहे. मात्र, प्रवाशांकडून कोरोना संशयित रुग्ण प्रवासात असल्याची तक्रार आल्यास, तत्काळ उपाययोजना करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. स्थानकावर रेल्वे कर्मचारी वर्गाला जागरूक केले आहे. रेल्वे रुग्णालयातील कर्मचारी दक्ष आहेत. कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यास, तत्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्याच्या सूचना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास, मुंबई सेंट्रल येथील जनजीवन राम रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था केली आहे. पश्चिम रेल्वेद्वारे जनजीवन राम रुग्णालयात कंट्रोल रूम स्थापित केला आहे. त्यामुळे मेडिकल अधिकाºयांचा ९००४४९०५६० व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू केला आहे. रुग्णालयातील कर्मचाºयांना मास्क देण्यात आले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेद्वारे जनजागृती केली जात आहे. रेल्वे कॉलनी, कार्यालय, स्थानकावर स्वच्छता करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांकडून देण्यात आली.

Web Title: There is no inspection of passengers in Mumbai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.