मुंबई : मुंबईतील कचरा उचलण्यासाठी सात वर्षांचे कंत्राट देण्यात येणार होते. यासाठी महापालिकेच्या अपेक्षित खर्चापेक्षा कमी खर्चाची निविदा ठेकेदारांनी भरली होती. मात्र, स्थायी समितीने पुन्हा एकदा हे प्रस्ताव फेटाळले आहेत. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे.जुन्या ठेकेदारांची मुदत संपल्यामुळे कचरा उचलण्यासाठी नवीन ठेकेदार नेमण्याचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने मांडले होते. मात्र गेले वर्षभर हे प्रस्ताव रखडल्यानंतर १४ गटांमधील तब्बल १२ गटांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित शेवटच्या दोन गटांच्या कामांचे प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायी समितीने फेटाळून लावले आहेत.या दोन्ही गटांसाठी अनुक्रमे १६६ कोटी आणि ९७ कोटींचे कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात येणार होते. जुन्या कंत्राटापेक्षा या ठेकेदारांचे दर खूप कमी असल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार होता. परंतु हे दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यामुळे पुन्हा जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. या ठेकेदारांचे दर अधिक असल्यामुळे त्यांना मुदतवाढ दिल्यास पुन्हा महापालिकेचे नुकसान होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.>आधीच्या प्रस्तावांवर चर्चाच नाहीविद्यमान ठेकेदारांची मुदत सप्टेंबर २०१८ पर्यंत आहे. पुढील सात वर्षांसाठी नवीन ठेकेदारांची नेमणूक करण्यात येणार होती. त्यानुसार १४ गटांमध्ये कंत्राट विभागून देण्यात आले. यापूर्वीच्या काही प्रस्तावांना विरोध झाल्यानंतर कचºयाचे प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळले होते. प्रशासनाने हे प्रस्ताव पुन्हा समितीपुढे आणल्यानंतर ते मंजूर करण्यात आले. हे प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर झाले.>कंत्राटाची किंमतएच-पूर्व व एच-पश्चिम (सांताक्रुझ, खार, वांद्रे) या विभागांमध्ये कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे. या कंत्राटाची किंमत १६६ कोटी रुपये आहे. के-पश्चिम (अंधेरी विभाग) ९४ कोटी रुपयांचे काम देण्यात येणार आहे.
कचरा उचलण्यासाठी नवीन ठेकेदार नाहीच; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 2:07 AM