उमेदवारी नाही, मात्र संभाव्यांची धामधूम सुरु

By admin | Published: May 24, 2015 11:11 PM2015-05-24T23:11:46+5:302015-05-24T23:11:46+5:30

एकाही राजकीय पक्षाने अद्याप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले नाही. मात्र संंभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातील

There is no nomination, but the feats of the candidates started | उमेदवारी नाही, मात्र संभाव्यांची धामधूम सुरु

उमेदवारी नाही, मात्र संभाव्यांची धामधूम सुरु

Next

दिपक मोहिते, वसई
एकाही राजकीय पक्षाने अद्याप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले नाही. मात्र संंभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातील काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांनी जर, उमेदवारी दिली तर ते नंतर ए बी फॉर्म सादर करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या मानसिकतेमुळे पक्षश्रेष्ठींचे धाबे दणाणले आहे. रविवारी अनेक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षात नाराजीचा सूर आहे. २७ मे पर्यंत एकाही राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित होणार नसल्याचे वृत्त आहे. शेवटच्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक शाखेच्या विविध कार्यालयावर प्रचंड गर्दी होणार आहे.
मोदींची लाट असतानाही विधानसभेच्या तीन जागा जिंकणाऱ्या बहुजन विकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळविण्यावरुन प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागातील समर्थकांसह पक्षश्रेष्ठींनी नियुक्त केलेल्या सदस्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तिकिट न मिळाल्यास नाराज झालेल्या उमेदवारांची समजूत कशी काढायची याबाबत बविआच्या वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय करण्यात येत आहे. काहींना स्वीकृत सदस्याचे गाजर दाखविण्यात येत आहेत. परंतु इच्छुक उमेदवार वरीष्ठांच्या या खेळीला दाद देत नसल्याचे दिसून येत आहेत.रविवारी वसई जनता सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. यानंतर आता सर्व राजकीय पक्ष कामाला लागतील. या बँकेनंतर बसीन कॅथॉलिक बँकेचीही निवडणूक होणार आहे. वसई जनता सहकारी बँकेच्या निवडणूक निकालाचे पडसाद या निवडणुकीवर उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा व बहुजन विकास आघाडीने बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मनसेचे नगरसेवक प्रफुल्ल पाटील पुन्हा रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या प्रभागामध्ये होत असलेली प्रचंड अनधिकृत बांधकामे त्यांना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. नालासोपारा येथे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ताकद वाढल्यामुळे येथे अनेक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे जनआंदोलन समितीचे नेते माजी आमदार विवेक पंडीत पुन्हा सक्रीय झाल्याच्या वावड्या उठल्यामुळे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. परंतु गावाच्या प्रश्नावरून ग्रामीण भागातील जनतेचे मतपरिवर्तन झाल्यामुळे त्यांना मतदारांची कितपत साथ मिळेल याबाबत शाशंकता आहे. जनतादल (धर्मनिरपेक्ष) पक्षातर्फे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची तरूण फळी कार्यरत झाली आहे. या पक्षानेही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करत सहा ते सात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. जनतादलाचे ज्येष्ठ नेते मनवेत तुस्कानो मात्र या सर्व राजकीय घडामोडीपासून अलिप्त आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आल्यामुळे ते आता निवडणूकलढवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते. अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे नेली असली तरी, जोपर्यंत वरीष्ठांकडून ए बी फॉर्म मिळत नाहीत तोपर्यंत अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही.

Web Title: There is no nomination, but the feats of the candidates started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.