मुंबई : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीतून मराठा समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले. रविवारी माध्यमांशी बोलताना पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून होणाऱ्या आरोपांना उत्तरे दिली.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडणाºया शरद पवार यांनी घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, ते स्पष्ट करावे. अन्यथा ही घटनादुरुस्ती म्हणजे मराठा समाजाला खुश करण्याचाच प्रकार असेल, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर, मराठा आरक्षणावर विधिमंडळात सर्वपक्षीय बैठक झाली आहे. कायदेशीर अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने एकत्र पाऊल टाकण्याचा निर्णय या बैठकीत झाला. हा निर्णय यशस्वी कसा होईल, हे पाहणे आपले काम आहे., असे पवार म्हणाले. तसेच घटनादुरुस्तीचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्यामुळे संसदेतून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेन, अशी हमीही पवार यांनी दिली.शरद पवार यांनी आघाडी सरकारच्या काळात आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विचारला होता. गडकरी यांचा प्रश्न अशोभनीय असल्याचे सांगतानाच आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. लोकांना नोकºयाही लागल्या. पण, काही लोक न्यायालयात गेले आणि त्यांनी स्थगिती मिळवली, असा संदर्भ देत महाराष्ट्रात असे काही निर्णय घेतले गेले याचे स्मरण गडकरी यांना नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.षण्ण्मुखानंद सभागृहात द महानगर सहकारी बँकेच्या नामांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जी.एस. महानगर सहकारी बँक लि. असे नाव धारण करून ही बँक गुलाबराव शेळके यांच्या स्मृती व विचार जागता ठेवून अधिक भरभराट करेल, असा मला विश्वास वाटतो, असे पवार म्हणाले.राजकीय बैठकांना जोरमराठा आरक्षणावरून राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी मराठा संघटनांची भेट घेताच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आपापल्या आमदारांच्या बैठका बोलावल्या आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवारी शिवसेना आमदार आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी होणाºया या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाईल. काँग्रेसनेही पुढील रणनीती ठरविण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्यांची बैठक बोलावली आहे. तर राष्ट्रवादीनेही सोमवारी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपाल सी. विद्यासागर राव व मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार आहे.
‘मराठा समाजाला खूश करण्याचा प्रश्नच नाही’ - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:51 AM