तलाव क्षेत्रात पाऊस पडलाच नाही

By admin | Published: June 22, 2016 02:36 AM2016-06-22T02:36:37+5:302016-06-22T02:36:37+5:30

बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर मान्सूनने मुंबईत हजेरी लावली आहे.त्यामुळे कडक उन्हापासून मुंबईकरांची सुटका झाली असली, तरी तहान भागण्याची सोय मात्र अद्यापही झालेली नाही

There is no rain in the lake area | तलाव क्षेत्रात पाऊस पडलाच नाही

तलाव क्षेत्रात पाऊस पडलाच नाही

Next

मुंबई : बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर मान्सूनने मुंबईत हजेरी लावली आहे.त्यामुळे कडक उन्हापासून मुंबईकरांची सुटका झाली असली, तरी तहान भागण्याची सोय मात्र अद्यापही झालेली नाही. मुंबईतील तुळशी व विहार तलाव परिसरात पाऊस दमदार बरसला़ मात्र ठाणे जिल्ह्यातील प्रमुख तलाव कोरडेच आहेत़ त्यामुळे घटणाऱ्या जलसाठ्याने धोक्याची घंटा वाजवली आहे़
गेल्यावर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे तलाव क्षेत्रांमध्ये मर्यादितच जलसाठा होता़ त्यामुळे पालिकेने पाणीपुरवठ्यात १५ टक्के आणि पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० टक्के कपात केली होती़ या बचतीमुळे पाणीपुरवठ्याचा कोटा वाढला़ मात्र मान्सून लांबणीवर पडल्याचा फटका तलाव क्षेत्राला बसला आहे़ तलावांची पातळी दिवसेंदिवस खालवत आहे़ परिणामी राखीव जलसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ आली आहे़ ३१ जुलैपर्यंत हा जलसाठा मुंबईची तहान भागवू शकणार आहे़ दरम्याऩ, मान्सूनने हजेरी लावल्यामुळे दिलासा मिळाला आहे़ तरीही तलाव क्षेत्रात मात्र पावसाने दडी मारली आहे़ सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाने तुळशी व विहार तलावात १०० मि़मी़ हून जास्त नोंद केली आहे़ परंतु भातसा, अपर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि तानसामध्ये पावसाने अद्याप खाते उघडलेले नाही़ (प्रतिनिधी)


जलसाठ्याची आकडेवारी मीटरमध्ये
तलावकमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३़१५१४३़२६१४५़६७
तानसा१२८़६३११८़८७१२०़७७ विहार८०़१२७३़९२७४़७८
तुळशी१३९़१७१३१़०७१३४़१७
अ.वैतरणा ६२७़१७६१९़९५९४़८७
भातसा१६६़५३१२९़३६१०७़१९
म. वैतरणा २८५़००२२०़००२४५़६०

 

Web Title: There is no rain in the lake area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.