मुंबईकरांवर पावसाचा मारा सुरूच
By admin | Published: September 2, 2014 02:34 AM2014-09-02T02:34:32+5:302014-09-02T02:34:32+5:30
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगराला झोडपून काढणा:या पावसाने सलग तिस:या दिवशीही आपला मारा कायम ठेवत मुंबईकरांना झोडपून काढले. स
Next
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगराला झोडपून काढणा:या पावसाने सलग तिस:या दिवशीही आपला मारा कायम ठेवत मुंबईकरांना झोडपून काढले. सकाळपासून सुरू झालेला हा पाऊस दिवसभर कोसळत राहिल्याने वाहतुकीवर याचा विपरीत परिणाम झाला. पूर्व द्रुतगती मार्गावरील रस्ते वाहतूक कोंडीसह लोकलही 1क् ते 15 मिनिटे विलंबाने धावत असल्याने सोमवारी मुंबईचा वेग मंदावला.
शनिवार, रविवार आणि आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार सकाळपासून मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरात पावसाचा मारा सुरू झाला. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, बोरीवली व पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, चेंबूर गोवंडीसह शहरातील गिरगाव, वरळी, भायखळा, लालबाग-परळ व दादर या ठिकाणांना पावसाने झोडपून काढले. सकाळी साडेअकरा वाजेर्पयत कोसळलेल्या पावसाने साडेबारा वाजेर्पयत काहीशी विश्रंती घेतली होती.
मात्र पुन्हा दीडएक वाजण्याच्या सुमारास सक्रिय झालेला पाऊस सायंकाळी 4 वाजेर्पयत कोसळत राहिला. त्यानंतर मात्र त्याने काहीशी उघडीप दिल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)
वाहतूक मंदावली
आरे फ्लायओव्हर, दिंडोशी पाडा, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, जे.जे. फ्लायओव्हरजवळ, पूर्व द्रुतगती मार्ग, दादर पश्चिमेकडील फ्लायओव्हर, लाल बहादूर शास्त्री मार्ग.
मध्य प्रदेश आणि विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भासह लगतच्या प्रदेशात पावसाचा मारा कायम आहे; आणि अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह मुंबईत दमदार पाऊस पडत आहे. पुढील 48 तास हीच परिस्थिती कायम राहणार असून, कमी दाबाच्या क्षेत्रचा प्रभाव कमी झाल्यानंतर पावसाचा जोर ओसरेल.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते
गर्दी मात्र आटोक्यात
बहुतांशी चाकरमान्यांकडे गणपती असल्याने तसेच कोकणातही प्रवासी यानिमित्ताने गेल्याने तुलनेने गर्दीच्या रेल्वे स्थानकांमध्ये असणारी नेहमीची गर्दी-झुंबड दिसून आली नाही. त्यामुळे लोकल लेट असल्या तरीही गाडय़ांमध्ये सहज प्रवेश मिळाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
हवेत गारवा
गेला आठवडाभर प्रचंड उकाडय़ाने हैराण प्रवासी गर्दीतून वाट काढताना जेरीस आले होते. मात्र ठाणो जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे हवेत गारवा होता. स. 9.3क्-1क्.क्क्र्पयत प्रवाशांनी पावसातून वाट काढतच स्थानक गाठले.
1डोंबिवली : रविवारी संध्याकाळी साडेपाचनंतर डोंबिवलीसह कल्याण परिसरात सुरू झालेल्या पावसाच्या लहान-मोठय़ा सरींची रिपरिप सोमवारी सकाळीही होती. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असतानाच त्याचा परिणाम उपनगरीय लोकल वाहतुकीवरही झाला. लोकल सेवा ठप्प झाली नसली तरीही वेग मंदावल्याने काही मिनिटे गाडय़ा विलंबाने धावल्या. मात्र लोकल ठप्प न झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान होते.
2 गणोशोत्सवानिमित्त तीन दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा कामावर जाणा:या प्रवाशांना त्याचा फटका बसला. एरव्ही सकाळी 8 वा. 11 मिनिटांच्या सुमारास डोंबिवली स्थानकात येणारी लेडीज स्पेशल गाडी सोमवारी स्थानकात 15 ते 17 मिनिटे विलंबाने आल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले.
3सकाळच्या सत्रतील कर्जत-कसारा तसेच आसनगाव, टिटवाळा, बदलापूर-अंबरनाथ आदी ठिकाणी डाऊनच्या लोकल नियोजित वेळेपेक्षा 1क् मिनिटे विलंबाने पोहोचल्या. त्याच लोकल पुन्हा अपमार्गे निघताना त्यात काहीशी भर पडल्याने लोकलचे वेळापत्रक साधारणत: 15 ते 22 मिनिटे विलंबाने धावले.