... 'त्यात' काहीही तथ्य नाही, माझा सीबीआय अन् पोलिसांवर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:20 PM2019-01-29T22:20:30+5:302019-01-29T22:22:19+5:30
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जी शंका उपस्थित केली होती त्यात काहीही तथ्य नाही.
मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या मृत्युबाबत होणाऱ्या चर्चांसंदर्भात पंकजा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, त्याथ काहीही तथ्य नाही, माझा सीबाआय अन् पोलिसांवर विश्वास असल्याचं पंकजा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या प्रकरणाची रॉद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. पंकजा यांच्या या वक्तव्यामुळे मुंडेंच्या मागणीला पंकजा यांची असहमती असल्याच दिसून येतंय.
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जी शंका उपस्थित केली होती त्यात काहीही तथ्य नाही. सीबीआय आणि पोलिसांनी तो केवळ अपघात होता असं स्पष्ट केलं होतं. आणि मला सीबीआय आणि पोलिसांवर विश्वास आहे, असे पंकजा यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केला होता. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, सीबीआय आणि पोलिसांवर माझा विश्वास असल्याचं म्हटलंय. तसेच या दाव्यात काही तथ्य नसल्याचंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, आमच्या घराण्याची ताकद मोठी होती. बाबा मंत्री होते. मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं. एवढं सगळं देऊनही तो राष्ट्रवादीत गेला. त्यामुळे आता आम्हा दोघांचे मार्ग वेगळे आहेत, असेही त्यांनी येथील मुलाखतीत बोलून दाखवले.