- खलील गिरकर मुंबई : आधार नोंदणी, अद्ययावतीकरण करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी राज्यात विविध बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्रे स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक बँकांमध्ये अद्याप ही केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व बँकांमध्ये ती सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.महाराष्ट्रात स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ३२९ केंद्रे सुरू करायची असताना केवळ २२६ केंद्रे सुरू आहेत. बँक आॅफ इंडियामध्ये १५३ केंद्रे सुरू करायची असताना केवळ ८३ केंद्रे सुरू आहेत. याचप्रमाणे सेंट्रल बँक आॅफ इंडियामध्ये ९९ केंद्रांऐवजी केवळ ३१ तर बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये १७० ऐवजी केवळ ११० केंद्रे तसेच पंजाब नॅशनल बँकेमध्ये ९४ ऐवजी ३२ केंद्रेच सुरू करण्यात आली आहेत. या बँकांच्या इतर शाखांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांना अधिक लाभ मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.राज्यात सध्या आधार नोंदणीची ३९०० केंद्रे सुरू आहेत. १८२ दिवसांपेक्षा जास्त दिवस वास्तव्य केल्यावर आधार नोंदणी करता येते अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तर आधार नोंदणी करतेवेळी केंद्र चालक मनमानी करत असल्याचा नागरिकांचाआरोप आहे.>प्रत्येक वेळी ४०० रुपयांचा भुर्दंडआधार कार्डवरील लग्नानंतरचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक बदलण्यासाठी प्रत्येकी ४०० रुपये शुल्क घेऊनही माहिती अद्ययावत करण्यासाठी तीनदा यावे लागेल, असे कामोठे येथील खासगी केंद्रांच्या चालकांकडून सांगण्यात आल्याचे एका महिलेने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरूनच निर्देश आले असून त्यानुसारच पैसे घेत असल्याचेही महिला केंद्र चालकाने सांगितले. याची शहानिशा केली असता प्रत्यक्षात असे कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडिया (आधार)च्या कार्यालयातील अधिकाºयांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आधार केंद्रे उघडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचा दावा करणाºया खासगी केंद्र चालकांकडून नागरिकांची मनमानी पद्धतीने लूट होत असल्याचे समोर आले आहे.
सरकारच्या सूचनेनंतर बँकांमध्ये आधार नोंदणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 1:42 AM