जुन्या मुंबई-पुणे मार्गावर टोलवाढ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 06:23 AM2018-04-11T06:23:59+5:302018-04-11T06:23:59+5:30
३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये ६ टक्के दरवाढ झाली आहे, पण याचा परिणाम मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर होणार नाही.
मुंबई : ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये ६ टक्के दरवाढ झाली आहे, पण याचा परिणाम मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर होणार नाही. जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील टोलमध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नाही.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने मुंबईतील आणि उर्वरित महाराष्ट्रातील टोलच्या संदर्भात विविध कंपन्यांशी करार केलेले आहेत. करार करताना त्यात काही महत्त्वाची धोरणे ठरवलेली आहेत. त्यानुसार, टोल किती वर्षांनी आणि किती प्रमाणात वाढवणार, हे त्या ठरलेले आहे. त्यानुसार टोलचे धोरण ठरत असते. या सगळ्याला मुंबई-पुणे जुना महामार्ग अपवाद ठरला आहे. त्यामुळे येथे टोलवाढ लागू करण्यात आली नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.