Join us  

मुंबई शहर आणि उपनगरात आज-उद्या पाणी नाही

By admin | Published: July 07, 2017 6:52 AM

महापालिकेच्या वतीने ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या भूमिगत बोगद्याजवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या झडपेची दुरुस्ती, मलबार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या वतीने ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या भूमिगत बोगद्याजवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या झडपेची दुरुस्ती, मलबार टेकडी जलाशयाच्या टप्पा क्रमांक दोनची संरचनात्मक तपासणी, तानसा (पूर्व व पश्चिम) जलवाहिन्यांवर नवीन झडपा बसविणे आणि धोबीतलाव आऊटलेट जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम ७ जुलै सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. ८ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हे काम सुरू राहील. हे काम करण्याकरिता मरोळ- मरोशीपासून माहीम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा २४ तासांकरिता बंद करावा लागणार आहे. या कारणास्तव ७ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ८ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई शहरातील काही विभागांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. परिणामी नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पाणीकपातीदरम्यान जलाशयातील पाण्याची पातळी लक्षात घेत आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.कफ परेड, नरिमन पॉइंट, बॅकबे, फोर्ट, बेलार्ड पिअर, कुलाबा, मिलिटरी, नेव्ही, बोरीबंदर/साबुसिद्दीक क्षेत्र, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, ई आणि एस रोड, लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड, भुलाभाई देसाई मार्ग, नेपियन्सी रोड, कारमायकल/अल्टामाउंट रोड, तुलसीवाडी, आर्थर रोड, जावजी दादाजी रोड, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन क्षेत्र, एस.एल. रहेजा रोड, मोदी रोड, एल.जे. रोड, एस.व्ही.एस. रोड, टी.एच. कटारिया रोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, एन.सी. केळकर रोड, एस.के. बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, बी.डी.डी. चाळ एन.एम. जोशी मार्ग, ए.बी. रोड, सेनापती बापट रोड, एस.व्ही.एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकर रोड, वरळी कोळीवाडा, सखुबाई मोहिते मार्ग, बुद्धमंदिर, अहुजा सप्लाय आणि ९०० मिलीमीटर व्यासाचा वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र (वरळी येथील बीडीडी चाळी), पेरी रोड, चॅपल रोड, बी.जे. रोड, खारदांडा, आंबेडकर रोड, माउंट मेरी, पाली माला रोड आणि युनियन पार्क क्षेत्र, नायर आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे पाणीपुरवठा होणार नाही. काळबादेवी रोड, भुलेश्वर मार्ग, फणसवाडी, जे.एस.एस. रोड, एस.व्ही.पी. रोड, ब्रिगेडीयर उस्मान मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, मौलाना आझाद रोड आणि कावासजी पटेल टँक रोड, कारपेंटर मार्ग, अलीभाई प्रेमजी मार्ग, आर.एस. निमकर मार्ग, पठ्ठे बापुराव मार्ग, खेतवाडी रोड, विठ्ठलभाई पटेल रोड, खाडिलकर रोड, गावदेवी रोड, बाबुलनाथ रोड, सीताराम पालकर मार्ग, नेताजी सुभाष रोड, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, एम.पी. मिल कम्पाउंड, बाणगंगा रोड, सिरी रोड, फॉर्जेट हिल रोड, फॉर्जेट स्ट्रीट क्षेत्र, मदनपुरा, आग्रीपाडा, केशवराव खाडे रोड, बी.जे. रोड, सांखळी रोड, साने गुरुजी मार्ग, नागपाडा, क्लार्क रोड, सखूबाई मोहिते मार्ग, जिजामाता नगर, डी.सी. रोड आणि ७५० मिलीमीटर व्यासाची वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र, रेक्लेमेशन, बाजार रोड, दिलीप कुमार परिमंडळ (पाली हिल, खारदांडा), कोलडोंगरी, झिकझॅक रोड क्षेत्र या भागात पाणीपुरवठा होणार नाही.