उद्या ठाण्यात पाणी नाही
By admin | Published: February 10, 2015 12:34 AM2015-02-10T00:34:11+5:302015-02-10T00:34:11+5:30
उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी १४ टक्के पाणीकपात करण्याचे
ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी १४ टक्के पाणीकपात करण्याचे निश्चित केल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार, बुधवार ११ फेबु्रवारीला सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत सिद्धेश्वर तलाव, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा या परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)