कार्यक्रमांसाठी सुरक्षा धोरण आहे का?

By admin | Published: February 18, 2016 06:52 AM2016-02-18T06:52:24+5:302016-02-18T06:52:24+5:30

मेक इन इंडिया’ सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे कलाकार, टेक्निशियन आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? अशी विचारणा करत

Is there a safety policy for programs? | कार्यक्रमांसाठी सुरक्षा धोरण आहे का?

कार्यक्रमांसाठी सुरक्षा धोरण आहे का?

Next

मुंबई : ‘मेक इन इंडिया’ सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे कलाकार, टेक्निशियन आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.
रविवारी गिरगाव येथे ‘महाराष्ट्र रजनी’ च्या सेटला आग लागल्याच्या घटनेकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. सिनेकलाकारांच्या सुरक्षेसाठी काहीच मार्गदर्शक तत्त्वे नसल्यासंदर्भात असोसिएशन आॅफ एडिंग जस्टिस या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
‘या घटनेमुळे मुंबईचे नाव खराब झाले. स्टेजवर सुमारे ५० लावणी नर्तिका नृत्य करत असताना स्टेजला आग लागली. स्टेजवर नृत्य करणाऱ्या कलाकारांना बाहेर जाण्यासाठी कोणता रस्ता आहे आणि आपत्कालीन स्थितीत बाहेर जाण्यासाठी कोणता रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे, याची काहीही कल्पना देण्यात आली नव्हती,’ असे याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील जमशेद मिस्त्री यांनी खंडपीठाला सांगितले.
त्यावर खंडपीठाने आत्तापर्यंत काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली असतील तर त्याची अंमलबजावणी करण्यात येते का? याचेही उत्तर खंडपीठाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
गिरगाव चौपाटीवरील आगीच्या दुर्घटनेबाबत आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत़ या आगीतून संशयाचा धूर निघत असताना भाजपाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष व आमदार अ‍ॅड़ आशीष शेलार यांनी महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाचे आयोजक व्हिजक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेन्मेंट या कंपनीला जबाबदार धरले आहे़ या कंपनीने व्यासपीठाखाली ठेवलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग लागली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे़
अग्शिमन दलात दाखल झालेले अद्ययावत १६ नवीन आगीचे बंब भायखळा येथील मुख्यालयात आज लोकार्पण करण्यात आले़ यावेळी
अ‍ॅड़ शेलार यांनी आपल्या भाषणातून हा संशय व्यक्त केला़ भाजपाचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ सप्ताह वांद्रे कुर्ला संकुलात भरविण्यात आला आहे़ मात्र महाराष्ट्राच्या परंपरेची ओळख करुन देणाऱ्या
गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमात आगीचा भडका उडाला आणि करोडोंचे नुकसान झाले़
आगीच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे़ मात्र अहवाल येईपर्यंत संशयाचे धुके वाढत चालले आहे़ अग्निशमन दल व आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्या सुचनांकडे आयोजकांनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे़ अहवाल सादर होण्यापूर्वीच आयोजकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात झाली आहे़ अग्निशमन दलाच्या कार्यक्रमात अ‍ॅड़ शेलार यांनीही आयोजकांकडे बोट दाखवून संशय व्यक्त केला़ मुंबईवर संभाव्य अतिरेकी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी पालिकेने अग्निशमन दलाचे हात मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार जैविक हल्ला, अणू हल्ला आणि रासायनिक हल्ल्याचा सामना करण्यासाठी हझार्ड्स मटेरियल अप्रेटस व्हेईकल खरेदी करण्यात येणार आहे़ अग्निशमन दलाच्या ताफ्यात आज १६ नवीन अद्ययावत बंब दाखल झाले़ या कार्यक्रमात आयुक्त अजय मेहता यांनी ही माहिती दिली़ त्याचबरोबर भविष्यात अग्निशमन दलासाठी जीपीएस यंत्रणा उभारण्यात येणार आहे़ ही यंत्रणा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी हमी आयुक्तांनी दिली़ यामुळे मदतकार्यही वेगाने सुरु होऊन जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.भाजपा सरकारचे मेक इन इंडिया म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. २००९ साली व्हायब्रंट गुजरातमध्ये १२ लाख कोटींची गुंतवणुक झाल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र केवळ ६२ हजार कोटींचीच गुंतवणूक झाली. घोषणेच्या केवळ ५टक्केच गुंतवणूक गुजरातमध्ये झाली मात्र त्याबदल्यात जमीनी उद्योजक आणि बिल्डरांच्या घशात घातल्या. याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये, अशी आमची इच्छा असल्याचे निरुपम म्हणाले. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, राज्यात नवीन गुंतवणूक यावी ही सर्वांची इच्छा आहे. मात्र, मेक इन इंडियाच्या झगमगाटाच्या आड फसवणूक होता कामा नये. जुन्याच घोषणा मेक इन इंडियाच्या नावाखाली खपविण्यात येत आहेत. ‘मेक इन इंडिया’ची ‘शो’बाजी कशाला?
मेक इन इंडिया सप्ताहावर महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, मला समजत नाही की, उद्योगधंद्याच्या वाढीसाठी मेक इन इंडियासारखे इव्हेंट करण्याची काय गरज आहे? तुम्ही मेक इन चायना ऐकले आहे का? मग ही शो बाजी कशासाठी,असा सवालही राज यांनी केला.

Web Title: Is there a safety policy for programs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.