Join us

मुंबईवर धुरक्याचे मळभ कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 5:29 AM

मुंबईच्या वातावरणात पसरलेल्या धुळीकणांमुळे सोमवारी येथील हवेची गुणवत्ता घसरली असतानाच मुंबई शहर आणि उपनगरावर पसरलेल्या धुरक्यामुळे दृश्यता कमी झाली होती. मंगळवारीही शहर आणि उपनगरावर कमी-अधिक फरकाने धुरक्याचे मळभ मुंबईवर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या वातावरणात पसरलेल्या धुळीकणांमुळे सोमवारी येथील हवेची गुणवत्ता घसरली असतानाच मुंबई शहर आणि उपनगरावर पसरलेल्या धुरक्यामुळे दृश्यता कमी झाली होती. मंगळवारीही शहर आणि उपनगरावर कमी-अधिक फरकाने धुरक्याचे मळभ मुंबईवर होते.पावसाची विश्रांती, वाढलेला उष्मा, पूर्वेकडून मुंबईकडे वाहणारे वारे आणि धुरके अशा संमिश्र वातावरणामुळे मुंबईचे हवामान बिघडले आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पसरलेले धुरके कमी असले तरी त्याचा प्रभाव कायम होता. माझगाव, कुलाबा, बोरीवली, मालाड, अंधेरी, भांडुप, बीकेसी, वरळी, चेंबूर आणि कुर्ला येथे दुपारच्या सुमारास धुरक्याची चादर पसरल्याचे चित्र होते. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे मंगळवारी शहर आणि उपनगरातील हवामान काहीसे ढगाळ नोंदविण्यात आले. दरम्यान, मंगळवारी मुंबईच्या हवेत ८९ टक्के आर्द्रता होती. रोज ही आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास असते. धूर, प्रदूषणामुळे आर्द्रतेमध्ये वाढ असून, यात धुरक्याने भर घातली आहे. याचा मुंबईकरांना त्रास होत आहे.

टॅग्स :मुंबई