समाजात समरसता असायलाच हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 02:29 AM2018-01-21T02:29:25+5:302018-01-21T02:29:35+5:30

हिंदू समाजाची अस्मिता व्यापक स्वरूपात जोपासणे हा आमच्या कामाचा मुख्य उद्देश आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत ‘लोकमत’चे शहर संपादक राहुल रनाळकर यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. या वेळी रा. स्व. संघासंदर्भातील विविध प्रश्नांना त्यांनी मुक्तपणे उत्तरे दिली.

There should be equality in society ... | समाजात समरसता असायलाच हवी...

समाजात समरसता असायलाच हवी...

Next

हिंदू समाज हा कोणाही विरोधात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही कोणाविरुद्ध नाही. आमच्या कार्याचा आशय हिंदू आहे. हिंदू समाजाची अस्मिता व्यापक स्वरूपात जोपासणे हा आमच्या कामाचा मुख्य उद्देश आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
संपर्क प्रमुख प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत ‘लोकमत’चे शहर संपादक राहुल रनाळकर यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. या वेळी रा. स्व. संघासंदर्भातील विविध प्रश्नांना त्यांनी मुक्तपणे उत्तरे दिली.

संघाविषयी समजापेक्षा गैरसमजच जास्त आहेत, असे का होते?
खरे तर गैरसमजासारखे काही नाही. ‘हिंदू’ या शब्दामुळे गैरसमज होत असावेत. ९३ वर्षांपासून कार्यरत असलेला संंघ हे जगातील सर्वांत मोठे गैरसरकारी संघटन आहे. सांस्कृतिक अर्थाने आपला संपूर्ण समाज एक आहे. त्यामुळे संघटन सांस्कृतिक अर्थाने उभे करण्याचा संघाचा मूळ विचार आहे. या समाजात अस्पृश्यता, जातीभेद आहे तसा पराक्रमही आहे. आपल्या देशाचा मूळ आधार हिंदू समाज आहे, पण त्यामुळे आम्ही अन्य धर्मियांच्या विरोधासाठी कार्य करतो, असा त्याचा अर्थ होत नाही. आपला देश ३ समाजांत नेहमी वाटला जातो. हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन. तथापि, हिंदू संस्कृती चहूबाजूने आहे. छोट्या-छोट्या अस्मिता गळून पडाव्यात आणि व्यापक हिंदू समाजाची अस्मिता उभी राहावी, हा संघाचा उद्देश आहे. संघाच्या पूर्वीही योगी अरविंद, विवेकानंद, लोकमान्य टिळक यांनी हिंदू समाजाला एकत्र करण्याचे प्रयत्न केले. हिंदू समाजात छोटे- मोठे भेद असले, तरी मूळ धागा हिंदुत्वाचा आहे.

कोरेगाव भीमादेखील संघाचे षडयंत्र असल्याचा आरोप होतो?
असे म्हणणे हा तर राजकारणाचा भाग झाला. दलितांना हिंदूंपासून वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे. कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराशी संघाचा काडीमात्रही संबंध नाही, अगदी बादरायणही नाही. सध्या भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे संघाचा संबंध जोडला जातो. आम्ही तर म्हणतोय, चौकशी होऊ द्या. मी तर अधिकृतपणाने सांगतो, संघात अक्षरश: हजारो दलित कार्यकर्ते कार्यरत आहेत. आम्ही जातीयता मानत नाही, अस्पृश्यता पाळत नाही. संघात कधीही कोणाची जात विचारली जात नाही. जात पाहून पद-जबाबदाºया दिल्या जात नाही. संघात कर्तृत्वाने स्वयंसेवक प्रगती करतात.

शिवप्रतिष्ठान आणि भिडे गुरुजींबद्दल काय सांगाल?
भिडे गुरुजींचे शिवप्रतिष्ठान विधायक कार्य करत आहे. तरुणांना स्वराज्यबद्दलचा अभिमान बाळगण्याचे धडे ते देतात. भिडे गुरुजींबद्दल आम्हाला आदर आहे, ती एक समर्पित व्यक्ती आहे. मुळात त्या माणसाचे काम कोणी समजावून घेतलेले नाही. कोरेगाव भीमाच्या संदर्भात म्हणाल, तर ऊठसूठ कोणावरही टीका करणे योग्य नाही. एखाद्या माणसाचे काम समजावून घेतले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे होता कामा नये.

गुजरातमधील भाजपाचे संख्याबळ कमी होणे, यामागे संघ आणि भाजपातील तणाव कारणीभूत आहे, असेही म्हटले जाते?
मुळात गुजरातमध्ये भाजपाला फटका बसला आहे, असे म्हणणे चूक आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाला अडीच टक्के मते जास्त मिळाली आहेत. नोटा चमत्कारिकरीत्या साडेपाच लाखांपर्यंत वाढला. फटका बसला असता, तर मतदानाची टक्केवारी वाढली नसती. संघाने नेहमीप्रमाणे चांगल्या लोकांना निवडून आणण्यासाठी गुजरातमध्येही काम केले.

संघाला राज्यघटना बदलायची आहे; संघाला घटना मान्य नाही, असेही म्हटले जाते?
संविधानातील कोणत्या गोष्टीला संघाचा विरोध आहे, हे तुम्हीच सांगा. खरे तर लोकशाही मूल्यांचा आणि संविधानाचा संघाने सदैव आदर केलेला आहे. संविधानाला विरोध करणे आणि संविधानावर बोलणे या गोष्टी विनाकारण एकत्र केल्या जातात. संविधानावर बोलणे ही चूक आहे का?

संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचा विरोध आहे, असेही म्हटले जाते. या संदर्भात तर मोहन भागवत यांनीही बिहार निवडणुकीपूर्वी वक्तव्य केले होते,
त्यानंतर भाजपाला निवडणूक गमवावीही लागली होती?
संघाने नेहमी राज्यघटनेचा आदर केलेला आहे. संविधानाला अभिप्रेत आरक्षणाला संघाचा पाठिंबा आहे. आमचा आरक्षणाला कधीच विरोध नव्हता, आत्ताही नाही. आर्थिक आरक्षणाबाबतही संघाची अद्याप काही भूमिका नाही. सरसंघचालकांच्या वक्तव्याचा विपर्यास तेव्हा केला गेला. आरक्षणाचा पुनर्विचार करावा, असे आपल्याला वाटते काय? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर, ज्यांना कोणाला असे वाटत असेल, त्यांनी तज्ज्ञांमार्फत त्याची चाचपणी करावी, असे सरसंघचालकांनी म्हटले होते. याचा अर्थ संघाचा आरक्षणाला विरोध आहे किंवा संघ आरक्षण संपवायला निघाला आहे, असा घेतला गेला. वास्तविक, तसे काहीही नव्हते.

समता, समानता या शब्दांनाही संघाचा विरोध आहे, संघाला समरसता आणायची आहे, असाही आरोप अनेकदा संघावर होतो?
खरे तर हे खेदजनक आहे. कुटुंबात समरसता असते, तशी समाजातही असावी, असे संघाचे म्हणणे आहे. समरसता ही समानतेकडे जाणारी पायरी आहे. मतभेदविरहित समाजनिर्मितीचा संघाला ध्यास आहे. समानता कायद्याने येत नाही. त्यासाठी संस्कारित समाजनिर्मितीच महत्त्वाची ठरते.

ब्राह्मणी विचार संघ समाजावर थोपवत असल्याचेही म्हटले जाते, यात किती तथ्य आहे?
यात अजिबात तथ्य नाही. संघाने काहीही थोपविण्याची कामे कधीही केलेली नाहीत. मुळात संघाची धर्माची कल्पना पूजा-अर्चेशी निगडित नाही. धर्मार्थ दवाखाना, धर्मार्थ पाणपोई, धर्मार्थ वजनकाटा यांचा धर्माशी काही संबंध असतो का? हिंदू धर्म तसाच कर्तव्याशी निगडित असल्याचे आम्ही मानतो. ब्राह्मणी विचार म्हणाल, तर संघाने तो कधीही कोणावरही थोपविलेला नाही. संघात कोणी कोणाचीही जात विचारत नाही. संघ कोणतेही कर्मकांड मानत नाही. आमच्यासोबत काम करणाºया कोणाचीही जात आम्हाला माहीत नसते. संघात सर्व जातींचे लोक आहेत. आम्ही कोणत्याच जातीयवादी गोष्टींना उत्तेजन देत नाही. संघ सर्वसमावेशक आहे. आमच्याकडे जात लक्षात घेऊन कधीही पद अथवा जबाबदारी दिली जात नाही. जातीच्या आधारावरील संघटना आम्हाला मान्य नाही. संघ प्रतिक्रियावादी नाही. माहितीचा अभाव अथवा जाणूनबुजून संघाबद्दल अशा गोष्टी पसरविल्या जातात. संघाचे सध्या १ लाख ७० हजार सेवा प्रकल्प देशभर कार्यरत आहेत. ६० हजार विद्यालये आहेत. या विद्यालयांमध्ये कमीतकमी शुल्कांत शिक्षणाची सोय केली जाते, हे समजून घ्यायला हवे.

संघाने सध्या त्रिपुरा काबीज करण्याचा चंग बांधला आहे? कम्युनिस्ट संपविण्याचा जणू प्रण संघाने केला आहे?
कम्युनिस्टांना संपविण्याचे खरे तर काही कारणच नाही. बंगालमध्ये ते आपोआपच संपले. लोकांना त्यांचा उबग आला. त्रिपुरात हिंदू वनवासी, आदिवासी, लामा मंडळी मोठ्या संख्येने राहतात. या सगळ््यांना संघाचे मोठे आकर्षण आहे. अलीकडेच सरसंघचालकांचा त्रिपुरात दौरा झाला. कम्युनिस्ट आहेत, म्हणून विरोधात संघ काम करतोय असे नाही, तर तिथल्या लोकांनाच आता कम्युनिस्ट सरकार नकोय. त्रिपुरामधील लोकांचा तिथल्या सरकारमुळे भ्रमनिरास झालेला आहे. लोकांना आता बदल अपेक्षित आहे.

भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतर संघाचा विस्तार अधिक वेगाने होऊ लागला, असेही काही लोक म्हणतात?
भाजपाचे सरकार आले म्हणून संघ वाढला आहे, असे नाही. भाजपा आणि संघ या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या आहेत. भाजपा सरकारमुळे संघाबद्दलची उत्सुकता वाढलीय, असे मात्र म्हणता येऊ शकते. संघाबद्दल लोकांना जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच आम्ही आता तंत्रज्ञानाचीही मदत घेत आहोत. तरुणांना संघात सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जॉइन आरएसएस’ ही आॅनलाइन मोहीम आम्ही सुरू केली. या संकेतस्थळाच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक लोक संघाशी जोडले गेले. सध्या देशभर ५५ हजार शाखांचे जाळे आहे. संघात काम करणाºयांना आवडीचे काम करायला मिळावे, असा आमचा प्रयत्न असतो. सध्या तरुण पिढीमध्ये करिअरची जागृती मोठी आहे. हा प्रश्न नाजूक आणि महत्त्वाचाही आहे. तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.

संघात महिलांना स्थान दिले जात नाही, असाही आरोप संघावर होतो?
असे म्हणणेही चुकीचा प्रचार करण्यासारखे आहे. संघाच्या शाखेत महिलांचा समावेश नसतो, राष्ट्रसेविका समितीच्या शाखा स्वतंत्रपणे चालतात. तुम्ही हा प्रश्न मला विचारला, हे चांगले झाले. कारण महिला समन्वयाचे काम माझ्याकडे आहे. सध्या अनेक महिलाही संघाचे पूर्ण वेळ काम करीत आहेत. घर सांभाळूनही अनेक महिला संघाचे काम करीत आहेत. संघाच्या ९० टक्के सेवाकार्यात महिलांचा सहभाग आहे. त्यामुळे महिलांना संघात स्थान दिले जात नाही, असे म्हणणे चूक आहे.

ऊनामध्ये जे काही घडले; त्याबद्दलही संघाची नेमकी भूमिका स्पष्टपणे समोर आली नाही?
संघाने त्याच वेळी जे झाले ते अयोग्य असल्याचे म्हणत त्या घटनेचा निषेध केला होता. ऊनामध्ये स्थानिक घटनास्थळी पोहोचून परिस्थिती अधिक चिघळणार नाही, याची काळजीही संघाच्या स्वयंसेवकांनी घेतली. तिथल्या स्थानिकांना याची पुरेपूर

Web Title: There should be equality in society ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई