कोरोना समस्या मांडण्यासाठी विधिमंडळात स्वतंत्र व्यासपीठ असावे - प्रवीण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:07 AM2021-04-20T04:07:00+5:302021-04-20T04:07:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील कोरोनाविषयक प्रश्न, अडचणी किंवा सूचना मांडण्यासाठी विधिमंडळात एक स्वतंत्र ...

There should be a separate platform in the legislature to raise the Corona issue - Praveen Darekar | कोरोना समस्या मांडण्यासाठी विधिमंडळात स्वतंत्र व्यासपीठ असावे - प्रवीण दरेकर

कोरोना समस्या मांडण्यासाठी विधिमंडळात स्वतंत्र व्यासपीठ असावे - प्रवीण दरेकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील कोरोनाविषयक प्रश्न, अडचणी किंवा सूचना मांडण्यासाठी विधिमंडळात एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘कोविडची परिस्थिती आणि लोकप्रतिनिधींची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर सर्व राज्यांच्या पीठासीन अधिकारी व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक साेमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली होती. या बैठकीत दरेकरांनी राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती विशद करून विविध सूचना केल्या. स्थानिक पातळीवर अनेक अडचणी येत असतात, कधी बेड मिळत नाही, कधी व्हेंटिलेटर मिळत नाही, इंजेक्शन, ऑक्सिजन मिळत नाही, त्या वेळी आमदार जिल्हाधिकारी यांना विनंती करतात. पण सरकारपर्यंत या अडचणी पोहोचविण्यासाठी विधिमंडळात एक स्वतंत्र व्यासपीठ आमदारांसाठी असले तर त्या माध्यमातून ते आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवू शकतील. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आपण याबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली. तसेच लोकसभाध्यक्षांनी पुढाकार घेऊन सर्व राज्यांतील पीठासीन अधिकारी, विरोधी पक्ष नेत्यांची एकत्रित बैठक आयोजित करून सर्वांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल दरेकर यांनी बिर्ला यांचे आभार मानले.

..........................

Web Title: There should be a separate platform in the legislature to raise the Corona issue - Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.