दृष्टिहीन कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वॉर्ड असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:04+5:302021-06-03T04:06:04+5:30

जनहित याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दृष्टिहीन कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वॉर्ड असावेत जनहित याचिका; राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश ...

There should be special wards for blind coronaries | दृष्टिहीन कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वॉर्ड असावेत

दृष्टिहीन कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वॉर्ड असावेत

Next

जनहित याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

दृष्टिहीन कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वॉर्ड असावेत

जनहित याचिका; राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दृष्टिहीन व्यक्तींसाठी अडथळेविरहित विशेष कोरोना वॉर्ड उपलब्ध करावेत. तसेच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण असलेले डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी असावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला या याचिकेवर १० जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

दृष्टिहीन व्यक्तींवर उपचार करणारे डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी विशेष प्रशिक्षित व संवेदनशील असला पाहिजे. त्यादृष्टीने दृष्टिहीन व्यक्तींसाठी विशेष कोरोना वॉर्ड असावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

दृष्टिहीन व्यक्तींना वावरायला सोपे जातील, असे विशेष कोरोना वॉर्ड जिल्हा सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करावे. तसेच या लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्राधान्याने लस द्यावी. तसेच दृष्टिहीन लोकांना संजय गांधी योजनेतून दरमहा एक हजार रुपये रक्कम देण्यात येते. ती रक्कम वाढवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अनाम-प्रेम संस्थेचे सह-संस्थापक अजित कुलकर्णी यांच्यावतीने ॲड. असीम सरोदे व ॲड. अजिंक्य उडाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

------------------------------

Web Title: There should be special wards for blind coronaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.