मुंबई- राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून खरी राष्ट्रवादी कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आजही याबाबत दिल्लीत सुनावणी झाली, मागील सुनावणीत शरद पवार गटाने बोगस कागदपत्रावरुन अजित पवार गटाला घेरले. आजच्या सुनावणीत दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप झाले. तर दुसरीकडे खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.
पक्ष विस्तारात अजितदादांचा कुठलाही हातभार नाही; सुनावणीत शरद पवार गटाचा दावा
दरम्यान, दोन्ही गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. अविश्वास ठरावावेळी झालेल्या व्हीपबाबत खासदार तटकरे यांनी मोठा दावा केला." मी सुप्रिया सुळे यांचं कालच स्टेटमेंट पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव आला तो लोकसभेत त्यावेळी चर्चेत होता. व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. मी लगेच त्या गोष्टी समोर आणणार नाही, असा मोठा दावा खासदार तटकरे यांनी केला. ठरावावर मतदानाची वेळ आळी तेव्हा काँग्रेसच्या नादाने यांनी त्यावेळी सभागृह सोडला. एनडीमध्ये आम्ही सहभागी झाल्यामुळे आम्ही सरकारसोबतच मतदान केलं असतं, असंही खासदार सुनिल तटकरे म्हणाल्या.
आजच्या सुनावणीत शरद पवार गटानं अजित पवार गटाकडून आयोगात दाखल केलेल्या बोगस प्रतिज्ञापत्राचा मुद्दा उचलला. या मुद्द्यावर आयोगाने आधी सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. बोगस प्रतिज्ञापत्र दाखल करणे हा फौजदारी गुन्हा आहे. आयोगाने याची दखल घेत यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने शरद पवार गट आग्रहाने करत आहे. त्याचसोबत शरद पवार हे अध्यक्षपदावर कायम राहिलेत. हा वाद अध्यक्षपदाचा नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे त्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वकिलांनी आयोगासमोर सुनावणीत केला.