Join us

आरेच्या हॉस्पिटलमध्ये होते शूटिंग, आता वाद चिघळला

By मनोहर कुंभेजकर | Published: February 04, 2024 5:38 PM

आरे हॉस्पिटल युनिट नंबर 16 येथील शासकीय  दवाखान्याच्या खजिकरणाचा घाट घातला जात आहे.

मुंबई - आरे हॉस्पिटल युनिट नंबर 16 येथील शासकीय  दवाखान्याच्या खजिकरणाचा घाट घातला जात आहे. आरेच्या अधिकाऱ्यांनी कुर्ल्याच्या आर्यन मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टला आरे हॉस्पिटलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शॉर्टलिस्ट केले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे हॉस्पिटल महानगरपालिका किंवा शासनाने चालू करावे यासाठी आम्ही आवाज उठून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही.मात्र आता आरे हॉस्पिटलचा उपयोग आता शूटिंग साठी होत असल्याची माहिती नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी 'लोकमत'ला दिली.

आम्ही आत्तापर्यंत येथे शूटिंग पाहिली नव्हती. परंतू आता गेली तीन चार दिवस  दिवसा ढवळ्या या आरेतील या शासकीय दवाखान्यात शूटिंग होते.परिणामी येथे येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागतो अशी माहिती त्यांनी दिली.

आरेतील शासकीय हॉस्पिटल हॆ जुने आहे. येथील 27 आदिवासी पाड्यातील सुमारे 8000 आदिवासी बांधवांना आणि येथील सुमारे 40000 नागरिकांना येथे आरोग्य सुविधाच मिळत नाही. आरोग्याच्या हितासाठी असलेले हॉस्पिटल हे  शूटिंगसाठी देऊन आरे प्रशासन आरेतील  जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची टिका कुमरे यांनी केली.

टॅग्स :मुंबईआरे