पालघर जिल्हयातील शाळांत घंटा झालीच नाही

By Admin | Published: January 13, 2015 10:38 PM2015-01-13T22:38:53+5:302015-01-13T22:38:53+5:30

पालघर जिल्हा शिक्षणक्षेत्र संघटन समन्वय समितीने मंगळवारी आयोजित केलेल्या लाक्षणिक संप आणि धरणे आंदोलनाला पालघर जिल्ह्यातील ५२७ शाळांमधील २६ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी पाठिंबा दिला

There was no bell in schools in Palghar district | पालघर जिल्हयातील शाळांत घंटा झालीच नाही

पालघर जिल्हयातील शाळांत घंटा झालीच नाही

googlenewsNext

पालघर : पालघर जिल्हा शिक्षणक्षेत्र संघटन समन्वय समितीने मंगळवारी आयोजित केलेल्या लाक्षणिक संप आणि धरणे आंदोलनाला पालघर जिल्ह्यातील ५२७ शाळांमधील २६ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे शाळा बंद राहिल्याने घंटानाद झालाच नाही. शासनाने २ फेब्रुवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास १० वी १२ वी च्या परिक्षांवर बहिष्क ार घालणार असल्याचे अध्यक्ष डॅरल डिमेलो यांनी सांगितले.
पालघर जिल्हा शिक्षणक्षेत्र संघटना समन्वय समितीअंतर्गत पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, वसई, वाडा, मोखाडा तालुक्यांतर्गत ५२५ मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती इ. अन्य सर्व माध्यमातील शाळामधील मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य समन्वय समितीच्या आदेशानुसार व जिल्हा संघटना समन्वय समितीच्या आजच्या एक दिवसीय लाक्षणिक संप व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शाळा आज बंद ठेवण्यात आल्या.
जिल्हा संघटना समन्वय समितीने शासनाकडे दिलेल्या निवेदनात २३ आॅक्टोबर २०१३ चा शासन आदेश रद्द करून चिपळूणकर समितीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात यावीत. या मागण्यांचे निवेदन आज अध्यक्ष डॅरल डिमेलो, ज्ञानदेव कानडे, इ. नी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे दिले. या मागण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास २ फेब्रुवारी पासून १० वी १२ वी च्या परिक्षावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे डिमेलो यांनी सांगितले.

Web Title: There was no bell in schools in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.