Join us

'इतर कुठल्या पक्षाचा विचार नव्हता, मी मृत्यूची वाट पाहत होते...'; नीलम गोऱ्हेंचं धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 1:28 PM

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई- गेली अनेक वर्षे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. दरम्यान, आज नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा गट का सोडला याची कारणे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  सांगितली. 

Video: संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असतानाच निघाला मोठा साप

गेल्या एक वर्षापासून शिवसेनेतील ठाकरे गटातून अनेक नेत्यांसह पदाधिकारी बाहेर पडत आहेत. आता विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, आता या आरोपांना स्वत: गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ठाकरे गटात संवादाचा अभाव आहे. मी कोणतही पद डोळ्यासमोर ठेऊन गेलेलो नाही, शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हा हा विषय तात्पुरता आहे असं वाटतं होतं. माझे ठिकठिकाणी दौरे होतं होते, पण पक्ष कार्यकर्ते फुटण्यापेक्षा समाजातच दुभंगत चालले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न कोण घेतच नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्या आहेत, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. 

नीलम गोऱ्हे म्हणाल्या,  एका दिवस पक्षात काही झालं म्हणून कोण पक्ष बदलत नाही. जानेवारी महिन्यात माझी आई आजारी पडली, तिचा २० तारखेला मृ्त्यू झाला. तेव्हा उद्धव ठाकरेंचा फोन आला. पण, त्यावेळी ताबडतोब एकनाथ शिंदे भेटायला आहे, दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस भेटायला आले होते. माझी अपेक्षाही नव्हती आम्ही त्यांना कळवलेही नव्हते. मला यावेळी हे थोडे कृतीशील आहेत असं वाटलं. दुसरं मी सातत्याने मेसेज करुन महिनाभर उत्तराची वाट पाहत बसायची, या कार्यपद्धतीला मी वैतागले होते. लोक म्हणायचीत तुम्हाला अक्सेस आहे, पण या अक्सेसचा काय उपयोग, असंही गोऱ्हे म्हणाल्या.

'मला त्यांनी भरपूर पदं दिली. मला त्यांनी काय द्यायच ठेवलं नाही, पण 'मी या कार्यपद्धतीला कंटाळून मृत्यूची वाट पाहत होते, यात बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही उपसभापती करता पण, तुम्हाला नेता करावेसे वाटले नाही. अनेकवेळा शिवाजी पार्कवर बोलायला दिले. पण महत्वाच्या निर्णयावेळी बोलावलं जात नव्हते, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी केले. 

टॅग्स :नीलम गो-हेशिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे