मुंबई : एच ईस्ट वॉर्डमधील सहा प्रभागांतील एकूण ३२ हजार ७४५ मतदार कमी झाले आहेत. प्रभागांची फेररचना आणि मतदारांचे स्थलांतर ही मतदार कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. मतदार कमी झाल्याने सर्वच पक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये २०१२ साली पार पडलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत ११ प्रभाग होते. मात्र आता नव्या प्रभाग रचनेनुसार एक प्रभाग कमी झाला आहे. या सर्व प्रभागांमध्ये गेल्या निवडणुकीतील आकडेवारनुसार शिवसेना प्रथम क्रमांकावर असून, त्यानंतर काँग्रेस, मनसेचा नंबर लागतो. मात्र १० प्रभागांमध्ये राजयकीय पक्षांना फेररचना आणि स्थानिकांचे स्थलांतर याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने ८७, ९२, ९३, ९४, ९५, ९६ प्रभागांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८७मध्ये जुना ८१ आणि ८६मधील काही परिसर समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुना ८५ आणि ८९ प्रभागातील परिसर हा नवीन ९२ प्रभागांत, जुना ८८ आणि ८९मधील परिसर ९३ नवीन प्रभागात, ८७ व ९0मधील परिसर ९४च्या नवीन प्रभागात, ८८, ९0 आणि ९१मधील परिसर ९५ या प्रभागात आणि ९0 व ९१मधील काही परिसर हा ९६ नवीन प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. ही फेररचना करतानाच उमेदवार कमी झाल्याचे समोर येते. विधासनभा निवडणुकीवेळी येथे २ लाख ६४ हजार ९८६ मतदार होते. आता याच मतदारांची संख्या पाहता ती ३२ हजार ७४५ने कमी झाली आहे. कमी झालेल्या मतदारांमुळे याचा फटका कुणाला आणि फायदा कुणाला मिळेल हे पाहावे लागेल. (प्रतिनिधी)प्रभाग क्रमांक-८७मतदार- ४३,६५0एकूण लोकसंख्या- ५७,३१५व्याप्ती- हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस. ३, सेन नगर, व्ही.एन. देसाई रुग्णालयप्रभाग क्रमांक-९४मतदार- ५३,0९६लोकसंख्या- ५९,९९८व्याप्ती- गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहरनगर प्रभाग क्रमांक-९२मतदार- ३१,५१६लोकसंख्या- ५२,९५१व्याप्ती- एमएमआरडीए ग्राउंड, बीकेसी, ज्ञानेश्वर नगर, भारत नगर प्रभाग क्रमांक-९५मतदार- ३७,0४४लोकसंख्या- ४९,८0५व्याप्ती- खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्मेन्ट टेक्निकल कॉलेज, निर्मल नगरप्रभाग क्रमांक-९३मतदार- ३५,८८२लोकसंख्या- ५८,0१४व्याप्ती- सरकारी वसाहत, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधी नगर प्रभाग क्रमांक-९६मतदार- ३१,0५३लोकसंख्या- ५४,६३६व्याप्ती- वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरीब नगर, वांद्रे कोर्ट
सहा प्रभागांतील ३२,७४५ मतदार झाले कमी
By admin | Published: January 31, 2017 2:42 AM