पश्चिम रेल्वेमार्गावरील ३६ रेल्वे स्थानके होणार पर्यावरणस्नेही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:38 AM2019-12-23T03:38:11+5:302019-12-23T03:38:33+5:30

नव्या वर्षात उपाययोजना : स्थानकाच्या ३० टक्के जागेत झाडे लावणार

There will be 3 railway stations on the Western Railway | पश्चिम रेल्वेमार्गावरील ३६ रेल्वे स्थानके होणार पर्यावरणस्नेही

पश्चिम रेल्वेमार्गावरील ३६ रेल्वे स्थानके होणार पर्यावरणस्नेही

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासन पर्यावरणस्नेही स्थानकांची निर्मिती करण्यासाठी भर देत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक मोहीम राबवित आहे. यासाठी नव्या वर्षात स्थानकाच्या ३० टक्के जागेत वृक्षारोपण करणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील एकूण ३६ स्थानकांवर वृक्षारोपण करून पर्यावरणस्नेही स्थानकांची निर्मिती करणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासन प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे. स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनेल, बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. आता ३६ स्थानकांवर झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ स्टँडर्डायझेशन ‘आयएसओ’ १४००१ प्रमाणपत्र मिळण्यासाठी पश्चिम रेल्वे स्थानके पर्यावरणस्नेही करणार आहे. हे काम मार्च २०२०पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून केला जाणार आहे. स्वच्छता, ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, तिकीट आणि अन्य सुविधा अशा एकूण १२ विभागांमध्ये आयएसओ प्रमाणपत्र देण्यात येते.
आयएसओ प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्थानकावरील प्रतीक्षालय, विद्युत बचतीची उपकरणे, प्रवाशांचे साहित्य वाहून नेण्यासाठी बॅटरीवर चालणारी गाडी, एटीव्हीएम, दिव्यांगांसाठी रॅम्प या बाबीदेखील उपयुक्त ठरतात. त्यामुळे मार्च २०२०पर्यंत ३६ स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीनुसार या पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

ही आहेत स्थानके
पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी, प्रभादेवी, लोअर परळ, दादर, माटुंगा रोड, माहीम, खार, सांताक्रुझ, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी , गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, मीरा रोड, भार्इंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, पालघर, बोईसर, विरार, उमरगाव, वापी, बिलीमोरा, उधवाडा, नवसारी, उधना, सुरत अशी ३६ स्थानकांची यादी तयार करण्यात आली आहे.

Web Title: There will be 3 railway stations on the Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.