सोमवारपासून मेट्रोच्या ४४ फेऱ्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:09 AM2018-09-21T06:09:50+5:302018-09-21T06:10:05+5:30
मुंबई मेट्रो वनने मेट्रो प्रवाशांना गणपती भेट दिली असून वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणा-या मेट्रोच्या येत्या सोमवार (दि. २४)पासून ४४ फे-या वाढणार आहेत.
मुंबई : मुंबई मेट्रो वनने मेट्रो प्रवाशांना गणपती भेट दिली असून वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणा-या मेट्रोच्या येत्या सोमवार (दि. २४)पासून ४४ फे-या वाढणार आहेत. त्यानुसार आता दररोज ३९६ऐवजी ४४० फेºया होणार असून सोमवार ते शुक्रवार ही सेवा उपलब्ध असेल.
सध्या सणांचे दिवस लक्षात घेता मेट्रोने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा वाढता कल लक्षात घेता ही सुविधा मुंबई मेट्रो वनने उपलबध करून दिली असून बुधवारी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पूर्वी दर आठ मिनिटांनी असलेली मेट्रोची फेरी आता ५ मिनिटांच्या फरकाने उपलब्ध केली जाईल. सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या वेळेत अतिरिक्त फेºयांचे नियोजन करण्यात आले आहे.
गर्दीच्या वेळी पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांना मेट्रोचा पर्याय वेळेच्या दृष्टीने फायदेशीर ठरत आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आली. जादा ४४ फेºयांचा फायदा मेट्रोच्या सुमारे ६६ हजार अतिरिक्त प्रवाशांना होणार असून त्यामुळे ३ मिनिटे वेळ वाचणार असल्याचा दावा त्यांनी केला. नवीन ४४ वाढीव फेºया २४ सप्टेंबरपासून मेट्रो प्रवाशांना उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली.