आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 09:27 AM2022-11-29T09:27:19+5:302022-11-29T09:28:18+5:30

गोसेखुर्द, कोयना, कोकणात ‘सी-प्लेन’साठी चाचपणी

There will be a helipad in every taluka, CM Eknath shinde ordered | आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश

आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिले. याचा फायदा वैद्यकीय साहाय्यासाठी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. 

गोसेखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने ‘सी-प्लेन’ सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळे असून, २८ धावपट्ट्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्णक्षमतेने वापर होत असून, शिर्डी विमानतळावर नाइट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. 

धावपट्ट्यांचे विस्तारीकरण आवश्यक - मुख्यमंत्री
 विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यातील धावपट्ट्यांचेदेखील विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चिती करावी, गंभीर रुग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता वैद्यकीय मदतीसाठीदेखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात सी-प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबतही चर्चा करण्यात आली.

Web Title: There will be a helipad in every taluka, CM Eknath shinde ordered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.