Join us

...तर देशात अराजक माजेल- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 3:05 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं आहे.

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं आहे. आता त्यांनी नोटाबंदीवरून भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे. नोटाबंदीच्या धक्क्यानं मृत्युमुखी पडलेल्यांची नुकसानभरपाई कोण देणार आहे. भाजपा स्वतःची चूक स्वीकारणार आहे का ?, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सांगतात, गरज पडल्यास पुन्हा नोटाबंदी होईल, नोटाबंदीसारखा प्रकार पुन्हा झाल्यास देशात अराजक माजेल, यांना कारभार कळतो की नाय, लोक आपल्या देशात जिवंत आहे, हे यांना समजतं नाही काय?. पण आता पुन्हा नोटाबंदीसारखा प्रकार केल्यास जनता शांत बसणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावून सांगितलं आहे.रघुराम राजन जर चुकीचे होते, तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परत का बोलावलं जातंय, तो व्यक्ती चुकीचा आहे, तर चुकीचाच आहे. त्या चुकीच्या व्यक्तीला तुम्ही कशाला परत बोलावत आहात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच सत्तेतून बाहेर पडण्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याची तुम्ही वाट पाहू नका.भाजपाकडून आम्हाला आता कशाचीच अपेक्षा राहिलेली नाही, सत्तेत राहून भाजपाकडून जनतेसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करून घेता येतील, त्या करून घेत आहोत. ज्या गोष्टी पटत नाहीत, त्यांना कडाडून विरोध करत आहोत. हार्दिकला उपोषणातून काहीही साध्य होणार नसल्याचं सांगितलं आहे. जनतेला आणि गुजरातला तुझी आवश्यकता असल्याचंही हार्दिकला सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनोटाबंदी