Join us

एसी लोकलमध्ये स्वयंचलित अग्निरोधक यंत्रणा येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:07 AM

देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहे. एसी लोकलच्या तिकीट विक्रीवरून एसी लोकलला दिवसेंदिवस प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहे. एसी लोकलच्या तिकीट विक्रीवरून एसी लोकलला दिवसेंदिवस प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भविष्यात येणाऱ्या लोकलमध्ये स्वयंचलित अग्निरोधक यंत्रणा समाविष्ट करण्याच्या सूचना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी बोर्डाला केल्या.रेल्वे बोर्डाचे रोलिंग स्टॉक सदस्य (मेंबर आॅफ रोलिंग स्टॉक) रवींद्र गुप्ता सध्या मुंबई दौºयावर आहेत. गुप्ता यांनी पश्चिम रेल्वे अधिकाºयांसोबत दौºयादरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. पश्चिम रेल्वे अधिकाºयांनी आतापर्यंतच्या एसी लोकलच्या अनुभवाने बोर्डाला लिहिलेल्या पत्रानुसार, एसी लोकलमध्ये स्वयंचलित अग्निरोधक यंत्रणेचा सोबतच आपत्कालीन स्थितीत स्वयंचलित अलार्म यंत्रणेचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.प्रवाशांच्या सुविधेसाठी एसी बोगीत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक रूट मॅप (डिजिटल मार्ग नकाशा) बसविण्यात यावा.सध्या स्थानकावर एसी लोकल दरवाजा उघडणे आणि बंद करण्याच्या प्रक्रियेला ४५ सेकंद लागतात. हा वेळ कमी करून २०-२५ सेकंदांपर्यंत करावा, याशिवाय रूफ मेंटेनेन्समध्येदेखील योग्य ते बदल केल्यास देखभाल करणे सोपे व कमी वेळखाऊ होईल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे बोर्डाचे सदस्य रवींद्र कुमार गुप्ता यांनी लोअर परळ येथील आॅटोमॅटिक स्टोरेज अँड रिट्रिवल यंत्रणेचे उद्घाटन केले.

टॅग्स :एसी लोकल