मुंबई : दादर स्थानकात दररोज गर्दीचे प्रमाण वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकात सुरक्षा वाढविण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलाने घेतला आहे. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही, स्कॅन मशीन आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाची वाढ करण्यात येईल.मध्य रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत ‘एकात्मिक सुरक्षा प्रणाली’ अंतर्गत वाढ करण्यात आली. याअंतर्गत मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी ‘माय लेफ्ट इज माय राइट’ ही मोहीम सुरू आहे.गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर जादा रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. यासह त्यांच्याकडून गर्दीच्या वेळी रांगेतून प्रवास करण्याचे आवाहन केले जाते. मात्र दादर स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी आता दादर स्थानकाच्या प्रत्येक प्रवेशद्वारात एक-एक जवान तैनात केला जाईल.>११ प्रवेशद्वारांजवळ गर्दी नियंत्रित होईलदादर रेल्वे स्थानकात ११ प्रवेशद्वारांवर एक-एक जवान तैनात केला जाईल. ते सकाळ-सायंकाळची गर्दी नियंत्रित करतील. अतिरिक्त १५ डोअर फे्रम मेटल डिटेक्टर आणि २२ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. चार बॅग स्कॅनर मशीन लावण्यात येणार आहेत. दादर रेल्वे स्थानकानंतर इतर स्थानकांची पाहणी करून सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दादर रेल्वे स्थानकात सुरक्षा वाढणार, सीसीटीव्ही आणि स्कॅन मशीन यांची होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 12:15 AM