आता येणार ‘कलमेगी’ आणि ‘फेंगशेन’ वादळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 05:59 AM2019-11-16T05:59:37+5:302019-11-16T05:59:44+5:30
अरबी समुद्रात क्यार, महा आणि बंगालच्या उपसागरातील बुलबुल ही चक्रीवादळे विरतात,
मुंबई : अरबी समुद्रात क्यार, महा आणि बंगालच्या उपसागरातील बुलबुल ही चक्रीवादळे विरतात, तोवर प्रशांत महासागरात नवी दोन वादळे उठत आहेत. मात्र, या दोन्ही वादळांचा भारताला तूर्तास धोका नसल्याचे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. ‘कलमेगी’ आणि ‘फेंगशेन’ अशी या दोन चक्रीवादळांची नावे आहेत.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, भारतासाठी हा चक्रीवादळांचा हंगाम आहे. नोव्हेंबरपर्यंत वादळे सक्रिय राहतात. त्यानंतर, हळूहळू गतिविधी मंदावते. प्रशांत महासागरावर आणखी एक वादळ तयार झाले आहे, ते लवकर बंगालच्या उपसागरावर सरकेल. आकडेवारी बघितल्यास ५० टक्के वादळे पश्चिमेकडे सरकतात. त्यानंतर, बंगालच्या उपसागरावर परिणाम करतात. दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र असलेले ‘कलमेगी’ हे कधीही वादळ बनू शकते. ‘फेंगशेन’ हे आधीपासून वादळ आहे. मात्र, ते पश्चिमेला दूर आहे. ‘कलमेगी’ विनाशकारी आहे. त्याने फिलिपिन्सला धोका निर्माण होईल. ‘फेंगशेन’ वादळ भारतासाठी थोडेसे धोकादायक आहे. कारण हे पश्चिमेकडे समुद्रात खोलवर आहे.